SIR Maharashtra : ‘एसआयआर’मधून वगळलेल्या दीड कोटींपैकी ३.९ लाख नागरिकांचे पुनर्नोंदणीसाठी अर्ज

मुंबई : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत प्रारूप मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या सुमारे १.५२ कोटी मतदारांपैकी आतापर्यंत फक्त ३.९ लाख नागरिकांनी पुन्हा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केले आहेत. वगळलेल्या मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे २.६ टक्के आहे. दरम्यान, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. (SIR Maharashtra)


३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या एसआयआरच्या प्रारूप मतदार यादीत राज्यातील ९.७९ कोटी मतदारांपैकी ७.७२ कोटी मतदारांचा समावेश झाला. सुमारे २.०७ कोटी मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट झाली नव्हती. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते की ही वगळलेली संख्या अंतिम मतदार यादीतून कायमस्वरूपी नावे वगळल्याचे निदर्शक नाही. पात्र मतदारांना दावा-हरकतीच्या प्रक्रियेद्वारे नाव पुन्हा समाविष्ट करून घेण्याची संधी देण्यात आली आहे.(SIR Maharashtra)



प्रारूप यादीत समावेश न झालेल्या मतदारांमध्ये अनुपस्थित किंवा पत्त्यावर न सापडलेले, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत, अन्यत्र नोंद असलेले किंवा दुबार नोंदणीचे मतदार अशा विविध श्रेणींचा समावेश आहे. त्यामुळे प्रारूप यादीतून वगळण्यात आलेल्या सर्वच मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करणे अपेक्षित नसल्याचे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे.(SIR Maharashtra)


एसआयआरच्या प्रक्रियेत नोटीस मिळालेल्या नागरिकांना बहुतांश प्रकरणांत प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्पष्ट केले आहे. आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) घरी आल्यानंतर त्यांच्याकडे कागदपत्रे देता येतील. बीएलओला व्हॉट्सॲपद्वारेही उत्तर किंवा आवश्यक कागदपत्रे पाठविता येणार आहेत.(SIR Maharashtra)



निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दावा-हरकती दाखल करण्याची मुदत ३० सप्टेंबरवरून १२ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. त्यानंतर नोटिसांवरील कार्यवाही पूर्ण करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंतची मुदत असून अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.(SIR Maharashtra)

Comments
Add Comment

OPPO K Series : OPPO K14 Plus भारतात लॉन्च; 8,000mAh बॅटरी आणि 144Hz AMOLED डिस्प्लेसह दमदार फीचर्स

मुंबई : OPPO ने भारतात K14 Plus स्मार्टफोन लॉन्च केला असून, कंपनीने K Series मध्ये नव्या मॉडेलची भर घातली आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 7360

Mumbai Rat Found In Dosa: किळसवाणा प्रकार! मुंबईच्या हॉटेलमध्ये मसाला डोशात मेलेला उंदीर, दोन घास घेताच...

मुंबई: हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचदा अस्वच्छता, किळसवाण्या पद्धतीने जेवण बनवणं आणि अनेक स्वच्छतेचे नियम

Pune Fire News : पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली!

पुणे : पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील (Laxmi Road) शगुन चौक परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India

Maharashtra Government : कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी ३ हजार कोटी

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र कर्जखात्यांना लाभाची रक्कम

चेन्नईचा मास्टरस्ट्रोक; आयपीएल फायनलमध्ये धोनीला बाद करणाऱ्या स्टारची CSK मध्ये एन्ट्री!

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी दहाही फ्रेंचायीझी आपल्या उणीवा दूर करून संघ बांधणीसाठी पुढाकार घेत आहेत. त्या दृष्टीने

Arunachal Pradesh Terror Attack : अरुणाचल प्रदेशात भारत-म्यानमार सीमेवर मोठा दहशतवादी हल्ला; आसाम रायफल्सचा एक जवान हुतात्मा, ४ जण गंभीर जखमी

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर गस्त घालणाऱ्या आसाम रायफल्सच्या पथकावर