Chandrashekhar Bawankule : ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी एक रुपयात जागा - उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

महाज्योतीसाठी ३०० कोटींचा निधी


मुंबई : इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या सर्वांगीण विकासासह विद्यार्थ्याना सुविधा पुरवण्यासाठी महसूलसह सर्व शासकीय विभागांच्या जागा एक रुपये दरात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले. गेल्या बैठकीत चर्चा झालेल्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेताना प्रशासनाची चालढकल खपवून घेतली जाणार नाही. ओबीसींच्या विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. इतर समाजाला ज्याप्रमाणे सुविधा व निधी उपलब्ध करून दिला जातो, त्याच धर्तीवर ओबीसी समाजालाही सर्व सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी केली.


ओबीसी समाज मंत्रिमंडळ उपसमितीची पाचवी बैठक मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध १२ मुद्दांवर चर्चा झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री गणेश नाईक, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्यासह इमाव विभागाचे उपसचिव, सहसचिव व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



मंत्री बावनकुळे म्हणाले, मंत्रीमंडळ उपसमितीच्या प्रत्येक बैठकीत किमान दोन प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले पाहिजेत. त्याबरोबरच परदेशी शिष्यवृत्तीचा प्रस्ताव तातडीने मंजूरीसाठी पाठवावा. ओबीसी समाजातील आत्महत्या केलेल्या १६ नावांसह पुढील समितीत प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवण्यात यावा. महाज्योतीसाठी ३०० कोटींचा निधी, वसतीगृह योजना, वनार्टी यांचे सर्व प्रस्ताव मंजूरीसाठी देण्यात यावेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी ओबीसी समाजाचा शासकीय सेवेतील प्रलंबित असणारा संपूर्ण बँकलॉग त्वरित भरून काढण्याची आग्रही मागणी केली. इतर घटकांप्रमाणेच ओबीसी समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर ओबीसी महामंडळालाही सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 'बार्टी'च्या धर्तीवर 'क्रांतीज्योती महात्मा फुले समता भवन' सुरू करण्यात यावे व त्यासाठी २०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करून पुढील बैठकीत सादरीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच महात्मा फुले लिखित 'तृतीय रत्न' या नाटकाच्या राज्यभरातील प्रयोगांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची सूचनाही भुजबळ यांनी केली.


पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या संदर्भात बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, महात्मा फुले यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा समग्र ग्रंथ प्रकाशित करणे, भव्य चित्ररथ तयार करणे, जीवनावर आधारित कॅलेंडर प्रकाशित करणे आणि नागपूर येथे विशेष मॅरेथॉनचे आयोजन करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Government : कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी ३ हजार कोटी

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र कर्जखात्यांना लाभाची रक्कम

चेन्नईचा मास्टरस्ट्रोक; आयपीएल फायनलमध्ये धोनीला बाद करणाऱ्या स्टारची CSK मध्ये एन्ट्री!

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी दहाही फ्रेंचायीझी आपल्या उणीवा दूर करून संघ बांधणीसाठी पुढाकार घेत आहेत. त्या दृष्टीने

Arunachal Pradesh Terror Attack : अरुणाचल प्रदेशात भारत-म्यानमार सीमेवर मोठा दहशतवादी हल्ला; आसाम रायफल्सचा एक जवान हुतात्मा, ४ जण गंभीर जखमी

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर गस्त घालणाऱ्या आसाम रायफल्सच्या पथकावर

Nashik Crime : 'माझे सांगणे पाळले नाही तर'...नाशिकमध्ये अघोरी पूजा ; जादूटोण्याची भीती घालत भोंदू महिलेने तरुणीशी केला स्वतःच्या मुलाचा साखरपुडा

Nashik Crime : अघोरी पूजा, उतारे आणि जादूटोण्याची भीती दाखवत धुळे येथील एका महिलेकडून सुमारे १ लाख ६० हजार रुपये

Maharashtra Cabinet : माजी अग्निवीरांना 10% आरक्षण ते कोल्हापूर खंडपीठासाठी 459 पदे; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय

मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यातील विविध क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाचे

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खासगी ‘टेंट सिटी’; नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून SOP निश्चित

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या निवासाची