Maharashtra News: कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या थांबणार, सरकार थेट तुमच्या दारी...

मुंबई: विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे आणि प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देणे, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी सरकार आता तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’विशेष अभियानांतर्गत 27 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर 2026 रोजी विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’राबविण्यात आले. शिवाय‘सेवा संकल्प अभियान’मध्ये आतापर्यंत राज्यभर 4 हजार 589 प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांचे वितरण करण्यात आल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.



‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ विशेष अभियान केवळ शिबिरे आयोजित करण्यापुरते मर्यादित न राहता भटके- विमुक्त समाजाच्या वस्त्या, तांडे आणि नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची माहिती गोळा करणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, शासकीय योजनांची माहिती देणे आणि आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. अभियानाच्या नोंदीनुसार 27 सप्टेंबर रोजी 54 ठिकाणी, तर 28 सप्टेंबर रोजी 44 ठिकाणी अशा एकूण 98 ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. लातूर, सातारा, धाराशिव, नांदेड, अहिल्यानगर, अमरावती, सोलापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगाव, नागपूर, सांगली, नंदुरबार, यवतमाळ, नाशिक, अकोला, वर्धा, हिंगोली आदी जिल्ह्यांतील विविध ठिकाणी ही शिबिरे घेण्यात आली.


ग्रामपंचायत कार्यालये, तहसील कार्यालये, समाजभवन यांसह भटक्या-विमुक्त समाजाच्या वस्त्या आणि तांड्यांमध्येही प्रशासनाने प्रत्यक्ष पोहोचून नागरिकांना सेवा उपलब्ध करून दिली. वाघी तांडा, नाथ गोसावी वस्ती, वडार वस्ती, गोसावी वस्ती, रामोशी वस्ती, धनगर वस्ती आणि पोखरी तांडा यांसारख्या ठिकाणी विशेष शिबिरे आणि प्रत्यक्ष संपर्क उपक्रम राबविण्यात आले. ‘सेवा संकल्प अभियान’मध्ये आतापर्यंत कॅम्प ट्रॅकरमध्ये उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 10 जिल्ह्यांतील 57 शिबिरांमधून एकूण 4 हजार 589 प्रमाणपत्रे आणि विविध कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये 992 जात प्रमाणपत्रे, 788 अन्य आवश्यक प्रमाणपत्रे आणि 710 उत्पन्न दाखले देण्यात आले आहेत. शिवाय, 582 रेशन कार्ड, 489 आधार कार्ड, 464 आयुष्मान भारत कार्ड, 215 रहिवास प्रमाणपत्रे आणि 141 अधिवास दाखलेही देण्यात आले आहेत.



याशिवाय 64 विवाह नोंदणी प्रमाणपत्रे, 63 नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्रे, 41 निवडणूक ओळखपत्रे, 34 जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रे, 5 दिव्यांग प्रमाणपत्रे आणि एक प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रही देण्यात आल्याची माहिती मंत्री सावे यांनी दिली. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार यवतमाळ जिल्ह्यात सहा शिबिरांमधून सर्वाधिक 1 हजार 145 प्रमाणपत्रे व कागदपत्रे देण्यात आली आहेत. नागपूर जिल्ह्यातील 15 शिबिरांमधून 785, नाशिकमधील सात शिबिरांमधून 690, धुळे जिल्ह्यातील नऊ शिबिरांमधून 615, साताऱ्यातील पाच शिबिरांमधून 529 तर जळगावमधील पाच शिबिरांमधून 364 प्रमाणपत्रे व कागदपत्रे देण्यात आली आहेत. अमरावती जिल्ह्यात 240, सांगलीमध्ये 146, अहिल्यानगरमध्ये 46 तर गोंदिया जिल्ह्यात 29 प्रमाणपत्रे व कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.‘सेवा संकल्प अभियान’मध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.


क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुटुंबांच्या भेटी घेऊन घरनिहाय माहिती संकलित केली तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक तपशील नोंदविले. अभियानात नागरिकांच्या अर्जांची नोंद, आवश्यक माहितीचे संकलन आणि मार्गदर्शनासोबतच तयार झालेली कागदपत्रे संबंधित वस्त्यांमध्ये जाऊन लाभार्थ्यांना प्रत्यक्ष देण्याची कार्यवाही करण्यात आली. यामुळे भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांसाठी वारंवार शासकीय कार्यालयात जाण्याची गरज कमी होऊन सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे.

Comments
Add Comment

Dattatray Bharne : महाराष्ट्राच्या रबी हंगामासाठी केंद्राकडे विशेष उपाययोजनांची मागणी; यांत्रिकीकरण-सूक्ष्म सिंचनासाठी ₹500 कोटींचा निधी

मुंबई : महाराष्ट्रातील काही भागांत कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आगामी रबी

Pune Fire News : पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली!

पुणे : पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील (Laxmi Road) शगुन चौक परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India

Chandrashekhar Bawankule : ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी एक रुपयात जागा - उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

महाज्योतीसाठी ३०० कोटींचा निधी मुंबई : इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या सर्वांगीण विकासासह विद्यार्थ्याना

Maharashtra Government : कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी ३ हजार कोटी

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र कर्जखात्यांना लाभाची रक्कम

Maharashtra Cabinet : माजी अग्निवीरांना 10% आरक्षण ते कोल्हापूर खंडपीठासाठी 459 पदे; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय

मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यातील विविध क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाचे

Devendra Fadnavis : पदवीपुरते शिक्षण पुरेसे नाही, बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्यविकास आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोकण, नाशिक विभागातील महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ मुंबई : देशातील युवा शक्तीला रोजगारक्षम बनविण्यासाठी