Drishyam 3 : दृश्यम 3 पाहा अन् फ्री पावभाजी खा! पण ‘ही’ अट लक्षात ठेवा

अभिनेता अजय देवगणच्या  (Ajay Devgan) बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘Drishyam: The Conclusion’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. आता निर्मात्यांकडून चाहत्यांसाठी खास प्रमोशनल ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ‘दृश्यम 3’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या काही प्रेक्षकांना चक्क मोफत पावभाजी मिळणार आहे. 

मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या  (Ajay Devgan) बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘Drishyam: The Conclusion’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. आता निर्मात्यांकडून चाहत्यांसाठी खास प्रमोशनल ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ‘दृश्यम 3’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या काही प्रेक्षकांना चक्क मोफत पावभाजी मिळणार आहे.






चित्रपटात पावभाजीचे विशेष महत्त्व


‘दृश्यम’च्या कथेत 2 ऑक्टोबर या तारखेला विशेष महत्त्व आहे. विजय साळगावकरने आपल्या कुटुंबासोबत 2 ऑक्टोबरला पणजीमध्ये असल्याचं दाखवण्यासाठी तयार केलेल्या कथेमध्ये पावभाजीचाही महत्त्वाचा उल्लेख आहे. आता चित्रपटातील हाच संदर्भ प्रमोशनमध्ये वापरण्यात आला आहे.



फ्रीमध्ये पावभाजी खाण्यासाठी ही अट लक्ष्यात ठेवा


या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रेक्षकांना एक अट पूर्ण करावी लागणार आहे. ‘Drishyam: The Conclusion’ची किमान 4 तिकिटे एकाच व्यवहारात बुक करावी लागतील. ही बुकिंग PVR INOXच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवरून करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये 4 तिकिटे बुक केल्यास या ऑफरचा लाभ मिळणार नाही.



फक्त 'याच' ग्राहकांना लाभ मिळणार


या पद्धतीने तिकिटे बुक करणाऱ्या पहिल्या 500 पात्र ग्राहकांना मोफत पावभाजीचं कूपन दिलं जाणार आहे. मात्र ही ऑफर देशभरातील सर्व PVR INOX थिएटरमध्ये उपलब्ध असणार नाही.


2 ऑक्टोबर रोजी मुंबई, दिल्ली-NCR आणि गुरुग्राममधील निवडक PVR INOX सिनेमागृहांमध्ये या कूपनचा वापर करता येणार आहे. त्यामुळे तिकीट बुक करण्यापूर्वी संबंधित थिएटरमध्ये ऑफर लागू आहे की नाही, हे तपासणं आवश्यक आहे.


‘दृश्यम’च्या पहिल्या भागातील विजय साळगावकरची 2 ऑक्टोबरची कथा आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. सत्संग, पावभाजी आणि त्यानंतर कुटुंबासोबत परतण्याची कथा त्याच्या अलिबीचा महत्त्वाचा भाग ठरते. त्यामुळे चित्रपटातील पावभाजीचा संदर्भ आता प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.


म्हणजेच ‘दृश्यम 3’चा शो, 2 ऑक्टोबर आणि प्लेटमध्ये पावभाजी, हे समीकरण चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. मात्र मोफत पावभाजीसाठी 4 किंवा त्याहून अधिक तिकिटे एकाच व्यवहारात बुक करणं आणि पहिल्या 500 पात्र ग्राहकांमध्ये नाव असणं आवश्यक आहे.


Comments
Add Comment

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये ‘ही’ 4 गाणी वाजणार नाहीत? बाल संरक्षण अधिकाऱ्यांचे पत्र

Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईव्ह

Maharashtra Film Tourism: महाराष्ट्रात चित्रपट पर्यटनाला मिळणार नवी झळाळी! पर्यटन विभाग आणि चित्रनगरीत 5 वर्षांचा करार

मुंबई: पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात महाराष्ट्राला चित्रपट

Family Kirana Store TVF : टीव्हीएफच्या ‘फॅमिली किराणा स्टोअर’चा नवा विक्रम; अवघ्या १० महिन्यांत यूट्यूबवर तीन सीझन प्रदर्शित

गज्जू भैयांच्या (Gajju Bhaiya) किराणा दुकानाचे दरवाजे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होण्यासाठी सज्ज झाले आहेत! द

Moushumi Chatterjee: मौसमी चॅटर्जींवर कोसळला दु:खाचा डोंगर, ज्येष्ठ अभिनेत्रीच्या पतीचे निधन

हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

TV Serial Ramayana : रामायण मालिकेतील रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी यांना कशी मिळाली ? 100 कलाकारांच्या ऑडिशननंतर रामानंद सागर यांनी घेतला होता मोठा निर्णय

TV Serial Ramayana Throwback : भारतीय मनोरंजनविश्वात ‘रामायण’ या मालिकेचे स्थान आजही अढळ आहे. रामानंद सागर यांच्या या लोकप्रिय

Big Boss 20: 'कैरेक्टर ढीला..तेरी पैंट में नाड़ा नहीं', लव्ह आणि स्काऊट मध्ये जोरदार वाद; बिग बॉस मध्ये मोठा राडा

Big Boss 20: बिग बॉस 20 च्या घरात 'कैरेक्टर ढीला' या गाण्यावरून लव्ह गिल आणि स्काऊट ओपी (Scout OP) यांच्यात जोरदार वाद रंगला.