वेस्ट इंडिजने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला 405 धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना आक्रमक सुरूवात करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा कशी सुरूवात करतात याकडे लक्ष लागून होतं. मागच्या सामन्यात शुभमन गिलने शतक ठोकलं होतं.पण रोहित शर्मा 32 धावा करून बाद झाला होता. त्यामुळे या सामन्यात रोहित शर्माकडून फार अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा रोहित शर्माने खऱ्या करून दाखवल्या. विजयी धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. समोर जो गोलंदाज येईल त्याला दणका दिला. रोहित शर्माने अर्धशतकी खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.रोहित शर्माने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर रोहित शर्माचा झंझावात हा सुरूच होता. रोहित शर्माने 72 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या. यावेळी त्याने 138.89 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम
वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या विशिष्ट संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा कमालीचा रेकॉर्ड आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल 93 षटकार ठोकून पहिल्या स्थानावर आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धही त्याने आतापर्यंत 40हून अधिक मारून आपला दबदबा निर्माण केला आहे. ख्रिस गेल इंग्लंडविरुद्ध 85, शाहिद आफ्रिदी श्रीलंकेविरुद्ध 63, सनथ जयसूर्या पाकिस्तानविरुद्ध 53, शाहिद आफ्रिदी भारताविरुद्ध 51, शाहिद आफ्रिदी न्यूझीलंडविरुद्ध 50, शाहिद आफ्रिदी झिम्बाब्वेविरुद्ध 47 आणि रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध 41 षटकार मारले आहेत.
कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात ठोकलं शतक
भारताचा कर्णधार शुभमन गिल याने 405 या धावांचा पाठलाग करताना कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. ...
रोहित शर्माने गाठला 12 हजारांचा पल्ला
भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्माने 282 डावांमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत जगातील दुसरा सर्वात जलद फलंदाज बनण्याचा बहुमान मिळवला आहे. या विक्रमी शर्यतीत भारताचा 'किंग' विराट कोहलीने अवघ्या 242 डावात हा पल्ला गाठला आहे. सचिन तेंडुलकर 300 डावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 12 हजार धावांच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोहितने 12,973 चेंडूंचा सामना केला. या विक्रमातही 'किंग' विराट कोहली पहिल्या स्थानावर असून त्याने 18853 चेंडू खेळले होते.