जपानमधील पब्लिक टॉयलेटची अशी सुविधा पाहून भारतीय महिला म्हणाली, ‘हे लोक इतका विचार कसा करतात ?’

Japan : जपान म्हटलं की शिस्त, स्वच्छता आणि अत्याधुनिक सुविधांची चर्चा हमखास होते. आता जपानमधील पब्लिक टॉयलेटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सुविधा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जपानमध्ये राहणाऱ्या भारतीय महिला अंकिता सहिगल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. जपानमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचाही किती बारकाईने विचार केला जातो, हे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे.



छोट्या बाथरूममध्येही खास सुविधा


जपानमधील काही सार्वजनिक वॉशरूममध्ये तयार होण्यासाठी स्वतंत्र आरसा आणि मेकअप काउंटरची सुविधा पाहायला मिळते. लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांसाठीही विशेष सोय करण्यात आलेली आहे. वॉशरूममध्येच मुलांना काही वेळ सुरक्षितपणे बसवण्यासाठी स्वतंत्र जागा दिलेली असते. त्यामुळे आईला इतर कामं करताना मुलाची काळजी घेणं सोपं होतं.



सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते ‘चेंजिंग बोर्ड’ने


या व्हिडिओमधील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे फोल्डेबल ‘चेंजिंग बोर्ड’. सुरुवातीला अंकिता यांना हा बोर्ड लहान मुलांचे डायपर बदलण्यासाठी वापरला जातो असं वाटलं. मात्र, त्याचा आणखी एक उपयोग पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. महिलांना कपडे किंवा शूज बदलताना जमिनीवर पाय ठेवण्याची गरज पडू नये, यासाठी या बोर्डचा वापर करता येतो. विशेषतः फर्शी ओली किंवा अस्वच्छ असेल, तर ही सुविधा अधिक उपयोगी ठरू शकते.




 

सुविधांमागचा विचार पाहून अंकिता भावुक


या छोट्या-छोट्या सुविधांमागील विचार पाहून अंकिता यांनी आश्चर्य व्यक्त केलं. नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन अशा सुविधा तयार केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये अशा सुविधा असणं किती उपयुक्त ठरू शकतं, यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जपानमधील या पब्लिक टॉयलेटच्या सुविधांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment

Iran US conflict : होर्मुझच्या खाडीत इराणचा मोठा पराक्रम; अमेरिकेची अत्याधुनिक मानवरहित पाणबुडी केली जप्त

तेहरान: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने एक मोठी आणि

Serbia President Resigns : सर्बियात सत्ता समीकरण बदलणार? वुसिक यांचा राजीनामा; PM पदावर नजर

बेलग्रेड : सर्बियाचे राजकारण ढवळून काढणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर

Himlung Himal avalanche : नेपाळमध्ये हिमलुंग हिमालयात हिमस्खलन; मृतांची संख्या ४ वर, १२ जण अजूनही बेपत्ता अन् शोधमोहीम सुरूच!

काठमांडू :

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्यातून बचावले नवे सर्वोच्च नेते; मोजतबा खामेनेईंबाबत इराणी नेत्याचा खळबळजनक दावा

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांदरम्यान इराणच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी

US Iran Conflict : इराणची आर्थिक कोंडी, होर्मुझचा पेच! ट्रम्प काय निर्णय घेणार?

वॉशिंग्टन : मध्य पूर्वेतील भू-राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

Nepal avalanche : नेपाळमध्ये निसर्गाचा कोप; हिमलुंग हिमाल बेस कॅम्पवर भीषण हिमस्खलन, 10 जण बेपत्ता

काठमांडू : शेजारील नेपाळ देश सध्या तीव्र नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात सापडला आहे. पश्चिम नेपाळमधील तिबेट