मुलं इंस्टाग्राम वापरत असतील तर पालक त्यांच्यावर नजर ठेवू शकतात का? जाणून घ्या मेटाचे नियम

Meta's rules : आजकाल अनेक किशोरवयीन मुलं (Teen) इंस्टाग्रामचा वापर करतात. त्यामुळे मुलं सोशल मीडियावर नेमकं काय करत आहेत, त्यांची प्रायव्हसी आणि ऑनलाइन सुरक्षितता याबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. अशा वेळी मुलांच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये थेट लॉगिन करून त्यांची संपूर्ण माहिती पाहता येते का, असा प्रश्नही उपस्थित होतो.


मेटाच्या माहितीनुसार, पालकांना आपल्या किशोरवयीन म्हणजेच 18 वर्षांखालील मुलाच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये थेट प्रवेश मिळत नाही. इंस्टाग्रामच्या अधिकृत माहितीनुसार, प्रायव्हसी कायद्यांमुळे अकाउंटच्या मालकाशिवाय इतर व्यक्तीला अनधिकृतपणे अकाउंटमध्ये प्रवेश देता येत नाही. इंस्टाग्रामवर 13 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या यूजर्सना त्यांच्या अकाउंटचे अधिकृत अकाउंट होल्डर मानले जाते. त्यामुळे पालक मुलाच्या अकाउंटमध्ये थेट लॉगिन करून त्याची संपूर्ण माहिती पाहू शकत नाहीत.



मग पालक मुलाच्या Instagram अकाउंटवर नजर कशी ठेवू शकतात ?


इंस्टाग्रामवर पालकांसाठी सुपरव्हिजन (Supervision) नावाचे फीचर उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने पालक आपल्या Teen मुलाच्या इंस्टाग्राम वापराबाबत काही गोष्टी समजून घेऊ आणि व्यवस्थापित करू शकतात. सुपरव्हिजनच्या माध्यमातून पालक मुलाच्या Teen Account शी संबंधित काही सेटिंग्ज पाहू शकतात. काही परिस्थितींमध्ये मुलाला अकाउंटची सुरक्षा कमी करू शकणारी एखादी सेटिंग बदलायची असल्यास पालकांना त्या बदलाला मंजुरी देण्याची किंवा नकार देण्याची सुविधा मिळू शकते. मात्र, सुपरव्हिजन म्हणजे मुलाच्या संपूर्ण इंस्टाग्राम अकाउंटमध्ये थेट प्रवेश मिळणे असे नाही.



Extra Supervision सुविधा कुठे उपलब्ध आहे ?


मेटाच्या माहितीनुसार, काही विशिष्ट देश आणि प्रदेशांमध्ये इंस्टाग्रामची Extra Supervision सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये फ़्लोरिडा (Florida) , कॉनेक्टिकट (Connecticut) , टेक्सस (Texas), पुर्तो रिको (Puerto Rico) , इंडोनेशिया (Indonesia) , युरोपियन युनिअन (European Union) , व्हिएतनाम (Vietnam) आणि ब्राझील (Brazil) यांचा समावेश आहे. या भागांमध्ये राहणाऱ्या किशोरवयीन यूजर्ससाठी स्थानिक कायद्यानुसार वयाच्या काही अटी लागू होऊ शकतात. त्या अटी पूर्ण झाल्यास पालक Extra Supervision फीचर्स सेट करू शकतात. Meta Facebook आणि Messenger, Instagram तसेच Meta Horizon यांसारख्या सेवांसाठीही Supervision पर्याय उपलब्ध करून देते.



Supervision सेट करण्यासाठी ID द्यावी लागू शकते


काही परिस्थितींमध्ये Supervision फीचर सेट करणारी व्यक्ती खरोखरच पालक किंवा गार्जियन आहे, याची खात्री करण्यासाठी Meta कडून ओळख पडताळणी केली जाऊ शकते. यासाठी वैध सरकारी ओळखपत्र किंवा दोन गैर-सरकारी ओळखपत्रे मागितली जाऊ शकतात. Meta च्या माहितीनुसार, ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 48 तासांपर्यंत वेळ लागू शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, पालकांची ID सुरक्षित पद्धतीने स्टोअर केली जाते आणि ओळख पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत ती डिलीट केली जाते. या ID चा वापर जाहिराती दाखवण्यासाठी केला जात नाही.



मुलाची मंजुरीही आवश्यक


पालकांची ओळख पडताळणी झाल्यानंतर Meta कडून Teen मुलाला Supervision सेट करण्यासाठी इनव्हाइट पाठवण्याचा पर्याय दिला जातो. यानंतर मुलाला समोरची व्यक्ती आपली आई, वडील किंवा गार्जियन असल्याची पुष्टी करावी लागते. जर किशोरवयीन मुलानेने रिक्वेस्ट स्वीकारली नाही किंवा 7 दिवसांच्या आत कोणताही प्रतिसाद दिला नाही, तर पालक पुन्हा इनव्हाइट पाठवू शकतात. काही परिस्थितींमध्ये मुलाकडून सातत्याने प्रतिसाद न मिळाल्यास Meta पालकांकडून अतिरिक्त माहिती मागू शकते. यामध्ये मुलाचे जन्म प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्रांचा समावेश असू शकतो.



थेट अकाउंट अ‍ॅक्सेस नाही, पण Supervision चा पर्याय


थोडक्यात सांगायचे झाल्यास, पालकांना आपल्या मुलाच्या इस्टाग्राम अकाउंटमध्ये थेट लॉगिन करून त्याची संपूर्ण माहिती पाहण्याची परवानगी मिळत नाही. मात्र, Meta कडून उपलब्ध असलेल्या Supervision फीचरच्या माध्यमातून पालक आपल्या Teen मुलाच्या Instagram वापराबाबत काही सेटिंग्ज आणि सुरक्षा पर्याय व्यवस्थापित करू शकतात. मात्र, या सुविधांची उपलब्धता देश, प्रदेश आणि स्थानिक कायद्यांनुसार वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या भागात कोणते Supervision पर्याय उपलब्ध आहेत, हे Instagram किंवा Meta च्या अधिकृत माहितीत तपासणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

Nashik-Delhi flight service : आनंदाची बातमी ! नाशिक-दिल्ली थेट विमानसेवा पुन्हा सुरू, १ ऑक्टोबरपासून सकाळच्या फ्लाइटची सुविधा

Nashik-Delhi flight service : नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ओझर येथील नाशिक

Captain Smit Machchhar : धक्कादायक खुलासा! स्मित मछार यांच्यावर चाकूने नाही, तर विमानाच्या 'क्रॅश ॲक्स'ने हल्ला झाला

Captain Smit Machchhar : दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानामध्ये थरारक आणि धक्कादायक घटना

Nashik Dongrale Rape Case : ​मालेगाव बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात नराधम विजय खैरनार दोषी ! शिक्षेचा फैसला 7 ऑक्टोबरला

Malegaon Dongrale Rape And Murder Case : डोंगराळे येथील साडेचार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात जलदगती

Pratyusha Banerjee Suicide Case: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणातून अखेर 10 वर्षांनी अभिनेता राहुल सिंह यांची निर्दोष मुक्तता

मुंबई: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येनंतर 10 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने अखेर बुधवारी

Mumbai Rewas Ferry : मुंबई-रेवस बोटसेवा आजपासून पुन्हा सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागच्या रेवसदरम्यान बंद असलेली प्रवासी बोटसेवा 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू

स्वयंपाकघरातील झुरळे आणि लाल मुंग्यांपासून वैतागलात ? ट्विंकल खन्नाने शेअर केला जबरदस्त घरगुती उपाय

स्वयंपाकघर कितीही स्वच्छ ठेवले तरी झुरळे किंवा लाल मुंग्या कधी ना कधी घरात शिरतातच. विशेषतः रात्री किचनची लाईट