रायगडमधील दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटनेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार (Diveagar) समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. आळंदी येथील 'विनर्स अ‍ॅकडमी'चे 8 विद्यार्थी समुद्रकिनाऱ्यावर बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या दुर्घटनेमुळे आळंदीसह राज्यभरात शोककळा पसरली आहे.(Chief Minister Devendra Fadanvis)



मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली व प्रशासनाला निर्देश


या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे:



"रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी, दिवेआगार येथे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या विनर्स अ‍ॅकडमी, आळंदीच्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आणि पीडादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत."

विद्यार्थ्यांचे पार्थिव तातडीने आळंदी येथे त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि संबंधित अधिकारी तात्काळ समन्वय साधून मदतकार्य करत आहेत.



उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून तात्काळ दखल


दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. बचावकार्य, मदतकार्य आणि सद्यस्थितीवर प्रशासनाने पूर्ण सतर्कतेने लक्ष ठेवावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच, दुर्घटनेतील मृतांच्या शोकसंतापलेल्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करत प्रशासनाने सर्व आवश्यक ती मदत आणि कायदेशीर कार्यवाही ताबडतोब पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पर्यटनासाठी गेलेल्या या तरुण विद्यार्थ्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.(Chief Minister Devendra Fadanvis)

Comments
Add Comment

अन्न व औषध प्रशासनाची राज्यव्यापी धडक कारवाई; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींचा अस्वच्छ व असुरक्षित अन्नसाठा जप्त

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिक आणि आस्थापनांवर अन्न व औषध

महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी निमित्त विशेष नाणे अन् टपाल तिकीट होणार प्रसिद्ध , मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराला यश

आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत, स्त्री शिक्षणाचे प्रणेते तसेच शेतकरी व कष्टकरी बांधवांच्या

Manori Ship Robbery : मनोरी समुद्रातील जहाजावर चोरीचा प्रयत्न अंगलट; विषारी वायूच्या गळतीमुळे चौघांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : मुंबईतील मनोरी (Manori) आणि गोरई किनाऱ्याजवळ (Gorai) अडकून पडलेल्या एका परदेशी जहाजावर चोरीच्या उद्देशाने

Central Railway : 'सेखों इंडियन एअरफोर्स मॅरेथॉन 2026'साठी मध्य रेल्वे धावणार; धावक आणि प्रवाशांसाठी 2 विशेष लोकल गाड्या जाहीर

मुंबई : भारतीय वायुदलाचे सुपुत्र आणि परमवीर चक्र विजेते फ्लाइंग ऑफिसर स्वर्गीय निर्मलजीत सिंह सेखों यांच्या

Devendra Fadnavis Captain Smit : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि खरा 'हिरो'! कॅप्टन स्मित यांच्या धैर्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई :

गांधी जयंतीची 3 दिवसांची सुट्टी… पण प्लॅन अजूनही नाही? 5 ठिकाणं, पटकन करा ट्रिप प्लॅन

मुंबई/पुणे : यावर्षी गांधी जयंती शुक्रवार, 2 ऑक्टोबर रोजी आल्यामुळे खवय्ये आणि प्रवाशांना सलग तीन दिवसांच्या लाँग