Captain Smit Machchhar : दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानामध्ये थरारक आणि धक्कादायक घटना घडली. कॉकपिटमध्येच भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर ओमानच्या को-पायलटने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत स्मित गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, विमान क्रॅश करण्याचा सह-वैमानिकाचा डाव होता, मात्र गंभीर जखमी होऊनही कॅप्टन मछार यांनी धैर्यदाखवून 174 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
स्मितवर कुऱ्हाडीने हल्ला
तपासातून असे समोर आले की, आरोपीने त्याच्यावर चाकू किंबा इतर बाह्य शस्त्र तस्करी करून आणले नव्हते. त्याऐवजी, त्याने कॉकपिटमध्ये आधीपासूनच असलेली अग्निशमन कुऱ्हाड, किंवा अपघात कुऱ्हाड वापरली. आंतरराष्ट्रीय विमानचालन नियमांनुसार, ही कुऱ्हाड कारखान्यातच विमानात बसवलेली असते. विमानचालन नियमांनुसार हे अनिवार्य आहे. हा पर्याय नसून, तो कायदा आहे.
पंतप्रधान मोदींकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानात हवेतच घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दुबईहून ...
विमानतळावर कडक सुरक्षा तपासणी होत असल्यामुळे विमानाच्या कॉकपिटपर्यंत कोणतीही धारदार वस्तू पोहोचू शकत नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र, फ्लायदुबईच्या FZ1073 विमानातील घटनेनंतर विमानातच ठेवण्यात येणाऱ्या आपत्कालीन कुऱ्हाडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्यादरम्यान क्रॅश अॅक्सचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत भारतीय कॅप्टन स्मित मच्छर जखमी झाले होते.
विमानात कुऱ्हाड का वापरली जाते ?
विमानातील ही कुऱ्हाड आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करण्यासाठी केला जातो. विमानात आग लागल्यास भिंती, छत किंवा पॅनेलच्या आत असलेल्या भागांपर्यंत पोहोचण्यासाठी काही रचना तोडण्याची गरज पडू शकते. अशावेळी प्रशिक्षित क्रू सदस्यांना हे साधन उपयोगी ठरते.
विमानाचा अपघात झाल्यानंतर बाहेर पडण्याचे सामान्य मार्ग बंद झाले, तर अडथळे दूर करण्यासाठीही या उपकरणाचा वापर केला जाऊ शकतो. याच कारणामुळे मोठ्या प्रवासी विमानांमध्ये कॉकपिट परिसरात क्रॅश अॅक्स किंवा तत्सम साधन ठेवण्याची तरतूद आहे. युरोपियन विमान वाहतूक नियमांनुसार ठरावीक वजनापेक्षा जास्त विमानांमध्ये फ्लाइट क्रूच्या भागात क्रॅश अॅक्स किंवा क्रॉबार असणे आवश्यक आहे.
फ्लायदुबईच्या विमानातील घटनेने मात्र या आपत्कालीन उपकरणाच्या गैरवापराबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. कॉकपिटमध्ये प्रवेश असलेल्या व्यक्तीकडूनच त्याचा वापर झाल्याचा आरोप असल्याने केवळ विमानतळावरील सुरक्षा पुरेशी आहे का, यावरही चर्चा होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय होते आणि कॉकपिटमध्ये नेमके काय घडले, याबाबत अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. फ्लायदुबईनेही तपास पूर्ण होईपर्यंत घटनेबाबत अंदाज बांधू नये, असे आवाहन केले आहे.