मुंबई: मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद बातमी आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या पुर्वसंध्येला केंद्र सरकारने पुण्यामध्ये 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला काही तासांपूर्वीच केंद्र सरकारने मंजुरी देण्यात आली आहे. 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र'ला केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. नेमकं मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोस्टमध्ये काय लिहिलंय, जाणून घेऊया...
Marathi Literature : पुण्यात उभारणार 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र'; केंद्र सरकारची मंजुरी
मुंबई : अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या (3 ऑक्टोबर) पूर्वसंध्येला जगभरातील मराठी भाषिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. ...
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी लिहिलंय की, "लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी... मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र' (Centre of Excellence for Studies in Classical Marathi) स्थापन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली असून, पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र' स्थापन करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम राज्य सरकारने आधीच हाती घेतले होते. तो केंद्राकडे सादर करुन आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार आहे. 'अभिजात मराठी भाषा दिना'च्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल महाराष्ट्रातील आम्हा सर्व नागरिकांना अत्यानंद होतो आहे. महाराष्ट्र, देश आणि जगभरातील मराठीजनांसाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची आहे. या निर्णयाबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो." पोस्टच्या शेवटी #मराठी असं लिहिलं आहे.
दरम्यान, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 4 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' (Classical Language) दर्जा बहाल केला होता. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयाचाच पुढील टप्पा म्हणून आता पुण्यात या उत्कृष्ट केंद्राची स्थापना केली जात आहे. या महत्त्वाच्या केंद्राच्या उभारणीमुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, संशोधनासाठी आणि विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी उपलब्ध होणार आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने, मराठीसह आसामी, बंगाली, पाली आणि प्राक्रित या भाषांसाठीही 'भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र' उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे.