Drishyam The Conclusion X Review : 'दृश्यम: द कन्क्लुजन' ला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद; अजय देवगणच्या चित्रपटाचा सोशल मीडियावर डंका!

मुंबई : वर्षभरातील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला 'दृश्यम: द कन्क्लुजन' (Drishyam The Conclusion ) अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठक (Abhishek Pathak) यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अजय देवगण, (Ajay Devgan) तब्बू, (Tabbu) श्रिया सरन आणि जयदीप अहलावत (jaydeep Ahlawat) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती आणि 'दृश्यम' फ्रँचायझीची लोकप्रियतेमुळे चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक होते. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी पहिला शो पाहिलेल्या प्रेक्षकांनी 'एक्स' (ट्विटर) वर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.



नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव आणि 'मास्टरपीस'चा दर्जा



चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. एका युझरने लिहिले, "#Drishyam - The Conclusion मध्ये नायकाने पुन्हा एकदा सर्वांना वाचवले! हा एक अत्यंत अप्रतिम आणि सस्पेन्सने भरलेला थ्रिलर सिनेमा आहे. काय जबरदस्त चित्रपट बनवला आहे!"


दुसऱ्या एका युझरने आपला अनुभव शेअर करताना लिहिले, "मी नुकताच चित्रपट पाहून बाहेर पडलो आहे आणि हा चित्रपट खरोखरच 'वाव' आहे! निर्मात्यांच्या मेहनतीला माझा सलाम. पहिल्या अर्ध्या भागात पुढे काय घडणार याचा अंदाज येत नव्हता, पण दुसऱ्या अर्ध्या भागात जो अनुभव मिळाला तो थक्क करणारा आहे. हा या मालिकेचा अगदी योग्य शेवट आहे आणि हा भाग दुसऱ्या भागापेक्षाही मोठा आणि दमदार आहे. कलाकारांचा अभिनय आणि संवाद अप्रतिम आहेत. हा चित्रपट प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन पाहिलाच पाहिजे." तसेच, आणखी एका युझरने चित्रपटाला ४ स्टार देत लिहिले, "चित्रपटाचे लेखन आणि पार्श्वसंगीत (BGM) अत्यंत प्रभावी आहे. सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. चित्रपटातील ट्विस्ट आणि टर्न्सचा अंदाज लावणे कठीण आहे, जी या थ्रिलर चित्रपटाची सर्वात मोठी ताकद आहे. नक्की बघा!"



समीक्षकांचा कौल



'द फ्री प्रेस जर्नल'च्या समीक्षकांनी या चित्रपटाला ३ स्टार्स दिले आहेत. समीक्षकांनी आपल्या पुनरावलोकनात लिहिले आहे की, "हा चित्रपट आपल्या नावाप्रमाणेच प्रेक्षकांना अगदी योग्य वेळी तेवढंच दाखवतो जेवढी गरज असते, आणि बाकीचा सस्पेन्स नंतर उलगडतो. जर संपूर्ण यंत्रणा तुमच्या विरोधात उभी असेल, तर त्यावर कशी मात करायची आणि बुद्धीने मार्ग कसा काढायचा, हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे."



बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता



चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणावर झाले होते. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे रेकॉर्ड करेल, अशी पूर्ण शक्यता आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग करेल असा अंदाज चित्रपट विश्लेषकांनी वर्तवला आहे.

Comments
Add Comment

Aadi Anant Movie: "आदि अनंत" चित्रपटाची घोषणा, संकर्षण कऱ्हाडेची खास पोस्ट; म्हणाला, "सगळ्यांनी आयुष्यात अनुभवलेल्या नात्यावर..."

मुंबई: अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडेचा लवकरच चाहत्यांच्या भेटीला नवाकोरा चित्रपट येत आहे. महेश लिमये

Nushrratt Bharuccha Accident Update: अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात, शस्त्रक्रियेची गरज; अधिकृत माहिती समोर

अभिनेत्री नुसरत भरुचा ही कामानिमित्त परदेशात असताना तिचा अपघात झाला. बाली येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु

Dharavu Marathi Movie : धाराऊ... ती गाय नाय... माय हाय! दिग्दर्शक मनिष शिंदेचा “धाराऊ” चित्रपट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

मोशन पोस्टरनंतर सोशल मीडियावर उत्सुकता* मुंबई : “धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!” या लक्षवेधी

October Movie Releases 2026 : ॲक्शन, हॉरर, कॉमेडी आणि रोमँटिक ड्रामाचा तडका ! ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये दृश्यम 3 सह 'या' 12 सिनेमांचा धमाका

October Movie Releases : ऑक्टोबर महिना सुरू झाला असून सिनेप्रेमींसाठी हा महिना मनोरंजनाची मोठी पर्वणी घेऊन आला आहे.

Drishyam 3 First Review : 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणार ? 'दृश्यम 3'चा फर्स्ट रिव्यू समोर

Drishyam 3 First Review : अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम 3’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रेलरला मिळालेल्या

Nushrratt Bharuccha: अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात; रुग्णालयात उपचार सुरु

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बाली येथे कामाच्या