अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 जण जखमी झाले आहेत. वर्धा येथील सिंदी मेघे परिसरातील सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव समितीचे 25 ते 30 कार्यकर्ते टेम्पो-पिकअप वाहनाने शेगाववरून दुर्गा माता मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतत होते. तेव्हा बोलेरो पिकअप वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनाचा चक्काचूर झाला. गाडीतील काही कार्यकर्ते थेट महामार्गाच्या बाजूला फेकले गेले. अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घनश्याम पाटील, प्रवीण बकाने, गोलू बादलगवार, ओम गावंडे, दत्ताजी खुरसागे, रोशन राऊत व मुनेश्वर ढोले अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. मृतांमधील सर्वजण सोमनाथ लेआउट सिंधी मेघे येथील रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
वर्धा येथील सिंदी मेघे परिसरातील सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव समितीचे 25 ते 30 कार्यकर्ते शेगावला गेले होते. ही सर्व तरुण मंडळी 28 तारखेस शेगावला पोहचली होती. त्यानंतर शेगाववरून टेम्पो-पिकअप वाहनाने दुर्गा माता मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतत होते. बोलेरो पिकअप वाहनाने 30 सप्टेंबर रोजी त्यांचा मूर्तीसह परतीचा प्रवास सूरू झाला. मूर्ती असल्याने वाहन अत्यंत संथ गतीने निघाले होते. अवघ्या 5 च्या स्पीड वाहन चालवत होते असं, रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवम राऊत यांनी सांगितलं. मूर्ती गावाजवळ पोहचत असतानाच 12 चाकी अजस्त्र ट्रक या गाडीला वेगात येऊन धडकला. महामार्गाच्या अगदी एका बाजूला आमचे वाहन जात असताना आमची काहीच चूक नव्हती. मात्र ट्रक धडकला आणि होत्याचे नव्हते झाले, असे राऊत यांनी सांगितलं.
दिवेआगारातील त्या घटनेनंतर आळंदीतील विनर्स अकादमीला फटका, परवाना केला रद्द; कारण की....
११ वी आणि १२ वी इयत्तेत शिकत असलेल्या८ अल्पवयीन मुलांचा दिवेआगर येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आळंदी येथील 'विनर्स अकॅडमी' या खासगी कोचिंग ...
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच जखमी रुग्णाची विचारपूस केली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे. या दुर्गा मंडळाचे हे आठवे वर्ष आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही मंडळी समृद्धी मार्गानेच मूर्ती घेऊन येत असतात. मूर्तीसोबत असल्याने डोळ्यात तेल घालून व दक्ष राहून प्रवास केला जातो. यावेळी 14 फूट उंचीची दुर्गामाता मूर्ती सोबत होती. पण हा प्रवास जीवघेणा ठरला.