Dr. Mohan Bhagwat: ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं सुतोवाच

मुंबई: ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन समजून घेण्याचे ज्ञान देते. काळाचा संदर्भ बदलला, तरी हे ज्ञान आणि त्यातून आलेली संस्कृती टिकून राहते. ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक आहे असं वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. प्रत्येकाने ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी आपल्या आयुष्यामध्ये अनुभवावी, असे आवाहन ही त्यांनी केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून व्हॅल्युएबल ग्रुप प्रस्तुत आणि मेराक इव्हेंट्स आयोजित ‘ज्ञानरंग: माऊलींच्या ओव्यांचा उत्सव’हा सोहळा शुक्रवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात उत्साहात पार पडला.



कार्यक्रमावेळी सरसंघचालक बोलत होते. यावेळी मोहन भागवत यांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’या मोबाइल ॲपचे लाँचिंगही करण्यात आले. ॲप लाँचिंगवेळी मोहन भागवत पुढे म्हणाले की, "जगाचे जीवन शाश्वत आहे, जगाकडे कसे पाहावे, जीवन कसे समजून घ्यावे, हे ज्ञान आपल्याला शिकवते. हे ज्ञान सर्वत्र एकच आहे. प्रत्येक कालखंडात महापुरुषांनी या ज्ञानाची आपल्या काळाच्या संदर्भात मांडणी केली. काळ बदलला, परिस्थिती बदलली, तरी ज्ञानाचे मूळ स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेली संस्कृती टिकून राहिली आहे. परकीय आक्रमणांच्या काळात भागवत भक्तीच्या आधारावर भारतीय समाज टिकून राहिला आणि वृद्धिंगत झाला." समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ज्ञानेश्वरीतील ज्ञान पोहोचायला हवं. आज जगाला मार्ग दाखवण्याची जबाबदारी भारताची आहे. ज्ञानेश्वरी हा भारताच्या ज्ञानपरंपरेतील अमूल्य ठेवा असून त्याला नव्या पिढीपर्यंत आणि जगभरातील जिज्ञासूंपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.



आजच्या आधुनिक माध्यमांचा उपयोग करून हा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या भावनेतून ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ नावाचे ॲप तयार करण्यात आले आहे. भक्ती, ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान या त्रिकुटांचा अनोखा संगम या उपक्रमातून साधला गेला आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला माऊलींच्या ओव्या रोज ऐकता, वाचता आणि समजून घेता येणार आहेत. ओवी ऐकतानाच तिचे शब्दागणिक वाचन करता येणार आहे. हे ॲप तुम्हाला आजपासून गुगल प्ले स्टोअर आणि ॲप्पल ॲप स्टोअरवर सुद्धा फ्री उपलब्ध आहे. त्यामुळे हे ॲप कोणीही सहज डाऊनलोड करू शकणार आहेत. या ॲपची संकल्पना व्हॅल्युएबल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमेय हेटे यांची आहे.



सोहळ्यात डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांसह ‘संपूर्ण ज्ञानेश्वरी श्रवण’ ही सीरीज YouTube वर प्रसारित करण्यात आली. सध्याच्या धावपळीच्या जीवनात ज्ञानेश्वरीचे वाचन करणे शक्य होत नाही, त्यांना ती सहजपणे ऐकता यावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमाची संकल्पना तसेच ज्ञानेश्वरीचे वाचन रेणुका देशकर यांनी केले असून श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन श्रीनिवास वर्णेकर यांनी केले आहे. ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ॲपच्या अधिकृत लोकार्पण सोहळ्यापूर्वी माऊली ज्ञानेश्वरांच्या अलौकिक रचनांवर आधारित मंत्रमुग्ध करणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन आणि केतकी चैतन्य यांनी संत ज्ञानेश्वरांच्या विविध ओव्या आणि संगीत रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; सीएसएमटी-विद्याविहार आणि हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत राहणार

मुंबई:

Marathi Literature : पुण्यात उभारणार 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र'; केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई : अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या (3 ऑक्टोबर) पूर्वसंध्येला जगभरातील मराठी भाषिकांसाठी एक अत्यंत आनंदाची

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार होणार, सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यास शासनाची मान्यता

मुंबई: फिल्म सिटीचा आता आणखीन विस्तार होणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार करण्यासाठी

Mumbai Weather: पुन्हा छत्री काढा! शनिवार- रविवार मुंबईकरांसाठी धोकादायक, पुढचे 48 तासांसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट

मुंबई: मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा कमालीचा फटका बसणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवाती पासूनच मुंबई, उपनगरातील

“कालच्या काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शब्द पाळला” — आमदार विक्रम पाचपुते

मुंबई : 30 सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या

Dino Morea Arrest: मोठी बातमी! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाला अटक

मिठी नदीतील गाळ उपसा आणि सफाईच्या कामातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या