Nashik Road Central Jail : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. MD ड्रग्स प्रकरणात कारागृहात असलेल्या सनी पगारेचा कारागृहातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ कारागृहातील बॅरेकमधून चित्रीकरण करण्यात आल्याचे दिसत असल्याने कैद्याच्या हातात मोबाईल फोन पोहोचला कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सनी पगारे स्वतःचे तसेच कारागृहातील खोलीचे चित्रीकरण करताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहाच्या आत मोबाईल फोन वापरण्यास परवानगी नसताना हा व्हिडीओ तयार झाल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वीही सनी पगारेचा व्हिडीओ व्हायरल
सनी पगारेचा कारागृहातील व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आलेला नाही. यापूर्वीही सनी पगारे आणि त्याच्या एका साथीदाराचा कारागृह परिसरात फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती आहे. आता पुन्हा बॅरेकमधून चित्रीकरण केलेला व्हिडीओ समोर आल्याने कारागृहातील सुरक्षा आणि तपासणी व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. (Nashik Road Central Jail Viral Video)
अमरावती : नवरात्रोत्सवासाठी दुर्गामूर्ती आणण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. धामणगाव पोलीस ठाण्याच्या ...
कारागृहात मोबाईल पोहोचला कसा ?
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची तपासणी, सुरक्षा व्यवस्था आणि CCTV देखरेख असतानाही मोबाईल फोनचा वापर झाल्याचे समोर येत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मोबाईल कारागृहात नेमका कसा पोहोचला, तो कोणाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आणि व्हिडीओ कधी शूट करण्यात आला, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वीही नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल फोन किंवा अमली पदार्थ आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कारागृहात प्रतिबंधित वस्तू पोहोचण्याचे मार्ग आणि सुरक्षा तपासणीतील संभाव्य त्रुटी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. (Nashik Road Central Jail Viral Video)
व्हिडीओची चौकशी होणार का ?
सनी पगारे हा नाशिकमधील चर्चेत असलेल्या MD ड्रग्स प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्याशी संबंधित कारागृहातील व्हिडीओ समोर आल्यानंतर या व्हिडीओची सत्यता, चित्रीकरणाची वेळ, वापरण्यात आलेला मोबाईल आणि तो कारागृहात कसा पोहोचला याबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील (Nashik Road Central Jail Viral Video) सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कारागृह प्रशासनाकडून या प्रकरणी काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.