Saturday, October 3, 2026

BYD ची लक्झरी गाडी Denza आता भारतात येणार; फीचर्स पाहून व्हाल थक्क!

BYD ची लक्झरी गाडी Denza आता भारतात येणार; फीचर्स पाहून व्हाल थक्क!

इलेक्ट्रॉनिक्स व्हेहिकल (EV) क्षेत्रात नामांकित असलेल्या BYD ने आपला लक्झरी ब्रँड Denza भारतात दाखल होणार असल्याची घोषणा केली आहे. BYD India च्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ब्रँडचा लोगो आणि नाव टाकून खाली Arriving Soon म्हणजेच 'लवकर येत आहे' असे कॅप्शन देण्यात आले आहे. Denza भारतात दाखल होण्याची तारीख आणि इतर तपशील हे जरी समोर आले नसले तरी ऑटोमोबाईलप्रेमी तसेच वाहन खरेदीदारामंध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ही ईव्ही कार अत्याधुनिक, उच्च कार्यक्षम असेल, असे आश्वासन देखील देण्यात आले आहे.

या वर्षाच्या अखेरीस डेन्झा डी९ एमपीव्ही आणि डेन्झा झेड९ जीटी हे मॉडेल्स भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डी९ मॉडेलची किंमत ८० लाखांपर्यंत असण्याचा अंदाज असून ही कार भारतात टोयोटा वेलफायरशी स्पर्धा करू शकते. दरम्यान, डेन्झा झेड९ जीटी हे मॉडेल एका विशिष्ट वर्गाची गरज पूर्ण करेल. तिची किंमत १.२ कोटी ते १.५ कोटींच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. यात 122.5 kWh क्षमतेची बॅटरी असेल असेदेखील सांगण्यात येते.

२०१० मध्ये स्थापन झालेली Denza ही सुरुवातीला प्रीमियम नवीन इलेक्ट्रिक व्हेहिकल्स बनवण्यासाठी BYD आणि Mercedes Benz यांचा संयुक्त उपक्रम होता. BYD ने बॅटरी आणि पावरक्षमतेमध्ये आपले योगदान दिले तर Mercedes Benzने डिझाईनमध्ये आणि अभियांत्रिकी मध्ये योगदान दिले. त्यानंतर २०२४ मध्ये Mercedes Benz पूर्णपणे यामधून बाहेर आल्यानंतर संपूर्ण मालकी ही BYD कडे गेली.

Denza ची वैशिष्ट्ये

Z9 GT या गाडीत १२२.५ kWh क्षमतेची बॅटरी असेल. ही कार ०-१०० किमी प्रति तास वेग २.७ सेकंदात गाठते. तिचा कमाल वेग २७० किमी प्रति तास आहे आणि रेंज ६०० किमी आहे. बॅटरी १० - ९७ टक्के चार्ज होण्यासाठी फक्त ९ मिनिटे लागतात.

D9 MPV या गाडीमध्ये १०३ kWh बॅटरी आणि समोरच्या बाजूला मोटार बसवली असल्याची शक्यता आहे. ही गाडी WLTP नुसार ५२० किमीची रेंज देते आणि २०० kW पर्यंतच्या डीसी चार्जिंगला सपोर्ट करते. आतमध्ये २+२+३ अशी आसनव्यवस्था असण्याची शक्यता आहे. गाडीची किंमत ९० लाखांच्या आसपास असू शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >