मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपने पुणे आणि नागपूर विभागातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर विभागातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना पक्षाने तिकीट जाहीर केले आहे.
याशिवाय पुणे विभागातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणूक २०२६ साठी पुढील नावांना आपली मंजुरी दिली आहे.
#BJP #Maharashtra https://t.co/1rKYjCeoK9 — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 4, 2026
- संशयितांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या ...






