Nitesh Rane: "MPSC विद्यार्थ्यांनो निश्चिंत राहा, सरकार तुमच्या पाठीशी", मंत्री नितेश राणे यांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात आणि विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी भेट दिली. शास्त्री पेठ येथील आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या, परीक्षा पद्धतीतील अडचणी आणि आयोगाच्या कारभाराबाबतच्या तक्रारी त्यांनी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, त्या सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यावर निर्णय होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले.



विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘मी मंत्री म्हणून नव्हे, तर तुमचा भाऊ आणि मित्र म्हणून येथे आलो आहे. विद्यार्थी म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहात. त्यामुळे येथे कोणतेही राजकारण किंवा राजकीय वक्तव्य करण्यासाठी आलो नसून, तुमच्या भावना आणि मागण्या समजून घेण्यासाठी आलो आहे,’ असे राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला सुमारे पावणेतीन तास वेळ देऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या असून, १३ पैकी १२ मागण्या मान्य झाल्याचे विद्यार्थ्यांनी मला सांगितले. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याने राजकीय व्यवस्था आणि राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी सरकारशी संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.


 


एमपीएससीच्या कारभाराबाबत तयार करण्यात आलेल्या समितीतील अधिकाऱ्यांशी आपला संपर्क असल्याचे सांगत राणे म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी समितीसमोर मांडल्या जात आहेत. अधिकारी प्रामाणिकपणे अहवाल देतील आणि भविष्यात एमपीएससीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, अशा पद्धतीने सुधारणा करण्यासाठी प्रयत्न होतील. परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ पद्धतीची मागणी आहे. ही भावना समितीच्या अहवालातही प्रतिबिंबित झाली तर संभ्रम राहणार नाही", असेही त्यांनी सांगितले.



"मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आणि कुटुंबप्रमुख आहेत. ते विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार नाहीत. सरकार तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या मागण्यांबाबत आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. हे राजकारणाचे व्यासपीठ नाही. व्यवस्थेतील चुका आणि त्रुटी दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत. एमपीएससीमधील वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी मी सुद्धा पूर्वी आंदोलन केले आहे. चुका सुधारण्यासाठी सरकार काम करत आहे. मात्र, संविधानाला गालबोट लागता कामा नये. संवैधानिक पदांबाबत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारला संधी दिली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर याच आंदोलनस्थळी जल्लोष होईल. त्यामुळे निश्चिंत राहा", असा विश्वास मंत्री राणे यांनी दिला.

Comments
Add Comment

Nagpur Water Cut: नागपूर शहरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना बसणारा फटका? वाचा यादी

नागपूर: नागपूर शहरामध्ये काही परिसरांमध्ये येत्या आठवड्यात पाणी पुरवठा बंद असणार आहे. शहराला पाणी पुरवठा केल्या

'महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा २०२६': शेतात राबणाऱ्या हातांना मिळाला 'शेतकरी' म्हणून कायदेशीर दर्जा

राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. २

Legislative Council Election : मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर; पुणे आणि नागपूरच्या उमेदवारांची नावं समोर

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या

Nagpur accident : नागपुरात भीषण अपघात; ट्रेलरच्या धडकेत पती-पत्नी आणि 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

नागपूर : वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाने घेतली उघडीप; 4 ऑक्टोबरला राज्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज

मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा

Maharashtra FDA raids : ठाणे-पालघरमध्ये FDA ची मोठी कारवाई; पान मसाला आणि तंबाखूसह 2.69 कोटींचा माल जप्त

ठाणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत प्रतिबंधित पान मसाला, सुगंधी