नागपूर : वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या 4 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तर त्यांचा 6 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. (Nagpur Accident)
दुचाकीवरून जाताना मोठा अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नाईक हे पत्नी सुनीता नाईक आणि दोन मुलांसह दुचाकीवरून जात होते. जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले.
हवेत तब्बल 30 हजार फूट उंचीवर फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या धक्कादायक घटनेत भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांनी प्रसंगावधान दाखवत मोठा धोका ...
तिघांचा जागीच मृत्य
या अपघातात योगेश नाईक, त्यांची पत्नी सुनीता आणि 4 वर्षांचा मुलगा गुलशन यांचा गंभीर दुखापतींमुळे जागीच मृत्यू झाला. तर 6 वर्षांचा तन्मय नाईक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर तन्मयला तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ( Jamtha Accident)
योगेश नाईक हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी होते. कामानिमित्त ते नागपुरात आले होते. कुटुंबासह ते बुटीबोरी एमआयडीसी परिसरात राहत होते. कामावरून घरी परतत असताना त्यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला.
वाहन चालक घटनास्थळावरून फरार
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघात घडताच ट्रेलर चालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. फरार ट्रेलर चालकाचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नाईक कुटुंबावर शोककळा पसरली आहे.