Team India Schedule: वनडे मालिका संपली, आता टीम इंडिया खेळणार 10 टी-20 सामने; कुठे- कधी पाहा संपूर्ण Schedule

मुंबई: एशियन गेम्स 2026 मध्ये (Asian Games 2026) भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे सामना खेळवल्यानंतर क्रिकेट प्रेमींचे लक्ष टी 20 सीरीजकडे लागले आहे. पुढचा महिनाभर भारतीय खेळाडू मॅच खेळणार आहेत. टी- 20 मालिकेला येत्या 6 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामने खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका संपताच भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तेथेही भारताला पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. त्यामुळे भारतीय संघ पुढचे 26 दिवस तब्बल 10 टी-20 सामने खेळणार आहे.



भारतीय संघाला इतक्या कमी कालावधीत सलग 10 सामने अत्यंत जिकरीचे ठरणार आहे. सततचा प्रवास, सामन्यांमधील कमी वेळ आणि वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेण्याचे आव्हान भारतीय खेळाडूंसमोर असेल. त्यामुळे फिटनेस, खेळाडूंचे रोटेशन आणि बेंच स्ट्रेंथ यांना मोठे महत्त्व मिळणार आहे. भारत विरूद्ध वेस्ट इंडिजचा टी 20 सामना भारतात आणि भारत विरूद्ध न्युझीलंड सामना न्युझीलंडमध्ये खेळवला जाणार आहे. भारतातल्या मैदानांची सहज प्रॅक्टिस असणाऱ्या भारतीय फलंदाजांना आणि गोलंदाजांना न्यूझीलंडमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळताना चांगलीच कसोटी लागणार आहे. संघ व्यवस्थापन कशा पद्धतीने सर्व खेळाडूंचे व्यवस्थापन करणार हे या टी 20 मॅचमध्ये पाहावं लागणार आहे.


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यरसमोर, संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंच्या कामाचा ताण सांभाळण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. भारतीय संघाला आपल्या आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित करून दमदार कामगिरी करत विजयाची मालिका कायम ठेवावी लागेल. मात्र, कर्णधार श्रेयस अय्यर वेस्ट इंडिज संघाला कमी लेखणार नाही. वेस्ट इंडिज संघात असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत जे भारतासमोर आव्हान उभे करू शकतात.




भारत-वेस्ट इंडिज टी-20 मालिकेचे वेळापत्रक (Team India vs West Indies T20 Schedule)


वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 सीरीज भारतात खेळवली जाणार आहे.




  • पहिला टी-20 : 6 ऑक्टोबर 2026 — लखनऊ (भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडिअम)

  • दुसरा टी-20 : 9 ऑक्टोबर 2026 — रांची (जीएससीए इंटरनॅशनल स्टेडिअम कॉम्प्लेक्स)

  • तिसरा टी-20 : 11 ऑक्टोबर 2026 — इंदूर (होळकर स्टेडिअम)

  • चौथा टी-20 : 14 ऑक्टोबर 2026 — हैदराबाद (राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम)

  • पाचवा टी-20 : 17 ऑक्टोबर 2026 — बंगळूरु (एम. चिन्नास्वामी स्टेडिअम)


भारत- न्यूझीलंड टी-20 मालिकेचे वेळापत्रक (Team India vs New Zealand T20 Schedule)


17 ऑक्टोबरला वेस्ट इंडिजविरुद्धचा पाचवा टी-20 सामना संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी रवाना होईल. न्यूझीलंडमध्ये भारताला पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेला 22 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल.




  • पहिला टी-20 : 22 ऑक्टोबर 2026 — क्राइस्टचर्च, हॅगली ओव्हल

  • दुसरा टी-20 : 24 ऑक्टोबर 2026 — क्राइस्टचर्च, हॅगली ओव्हल

  • तिसरा टी-20 : 27 ऑक्टोबर 2026 — वेलिंग्टन, स्काय स्टेडियम

  • चौथा टी-20 : 30 ऑक्टोबर 2026 — ऑकलंड, ईडन पार्क

  • पाचवा टी-20 : 1 नोव्हेंबर 2026 — हॅमिल्टन, सेडन पार्क

Comments
Add Comment

Asian Games 2026 : भारताचा विजयाचा डंका! २१ सुवर्णपदकांसह मिळवली एकूण ८५ पदके

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ आज समाप्त झाली असून भारताने यावर्षी विजयाचा डंका वाजवलाय. एकूण ८५ पदकं भारतीय

India vs Australia WCL 2026: शेर अभी जिंदा हैं...युवराज सिंगच्या फलंदाजीने ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारली

'शेर अभी जिंदा हैं' हा डायलॉग जर आताच्या घडीला कोणाला लागू होत असेल तर तो आहे भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग. एका

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 पदकतालिकेत भारताची ऐतिहासिक कामगिरी; 21 सुवर्णपदकांसह पटकावले चौथे स्थान

मुंबई : आयची-नागोया येथे झालेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी केली. 14 दिवसांच्या या

IND vs WI: तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजची सरशी, भारताने दिलेलं 351 धावांचं लक्ष्य गाठलं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा

Asian Games 2026: भारतीय हॉकी संघाने नागोयात रचला इतिहास; सुवर्णपदकासह 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे तिकीट कन्फर्म

नवी दिल्ली: पुरूष हॉकी स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. भारताने

Washington Sundar Catch: वॉशिंग्टन सुंदरचा 'तो' खतरनाक झेल...पाकिस्तानच्या माझ सदाकतला धूळ चारली

एशियन गेम्स 2026 च्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. जपानमधील निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्क