Sunday, October 4, 2026

India vs Australia WCL 2026: शेर अभी जिंदा हैं...युवराज सिंगच्या फलंदाजीने ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारली

India vs Australia WCL 2026: शेर अभी जिंदा हैं...युवराज सिंगच्या फलंदाजीने ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारली

'शेर अभी जिंदा हैं' हा डायलॉग जर आताच्या घडीला कोणाला लागू होत असेल तर तो आहे भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग. एका बाजूला आशियाई क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यात षटकारांची बरसात करून युवा सलामीवीर अभिषेक शर्माने धुव्वा उडवला. तर दुसरीकडे चॅम्पियन्स लीगमध्ये अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि भारतीय टीमचा कर्णधार युवराज सिंग याने आपल्या फलंदाजीने पुनरागमन केले. गुरु शिष्याच्या जोडीचा भारतासाठी खेळ भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरली.

काल (३ ऑक्टोबर २०२६) भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत विश्वचषक स्पर्धेत दिमाखदार सुरुवात केली. चॅम्पिअन्स लीगच्या या सामन्यामध्ये जुन्या खेळाडूंची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली. वर्ल्ड चॅम्पिअनशिप ऑफ लेजेंड्स २०२६ च्या पहिल्या सामन्यात भारताने ४६ धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. शारजा क्रिकेट स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हर्समध्ये १९६ धावांचे ध्येय ऑस्ट्रलिया संघासमोर ठेवले. या धावांचा सामना करताना ऑस्ट्रेलिया टीम मात्र १६.२ षटकांतच १५० धावा करताना गार झाली. कालच्या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही उत्तम ठरले. कालच्या सामन्यात आपल्या खेळाने समोरच्या संघाचा धुव्वा उडवला तो भारताचा अनुभवी खेळाडू युवराज सिंगने.

युवराजने आपल्या शानदार, धडाकेबाज खेळाची झलक कालच्या सामन्यात दाखवली. त्याने ४४ चेंडूंमध्ये ७१ धावांची कामगिरी केली.युवराजने मैदानावर पाय ठेवताच आपल्या जुन्या आक्रम शैलीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. १६१.३६ च्या स्ट्राईक रेटवर फलंदाजी करत त्याने चार चौकार आणि पाच षटकार मारले. त्याच्या उत्कृष्ट अशा फलंदाजीने टीमला एका भक्कम धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >