नागपूर: नागपूर शहरामध्ये काही परिसरांमध्ये येत्या आठवड्यात पाणी पुरवठा बंद असणार आहे. शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या यंत्रणेमध्ये दुरूस्ती, जलवाहिनी स्थलांतराचे काम आणि देखभालीच्या कामामुळे शहरामध्ये पाणीकपात केली जाणार आहे. दोन वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी कपात केली जाणार आहे. 6 ऑक्टोबरला अर्थात येत्या मंगळवारी पेंच 4 जलशुद्धीकरण केंद्रातून आणि पेंच 1 जलशुद्धीकरण केंद्रातून ज्या परिसराला पाणी पुरवठा होतो, त्या भागांमध्ये पाणी कपात केली जाणार आहे.
राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. २ ऑक्टोबर २०२६ पशु संपूर्ण राज्यात 'महिला ...
नागपूर शहरातील ज्या परिसरांना पेंच 4 आणि पेंच 1 जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो, त्या भागांमध्ये मंगळवारी पाणी पुरवठा बंद असेल. पेंच 4 जलशुद्धीकरण केंद्रामध्ये 36 तास आणि पेंच 1 जलशुद्धीकरण केंद्रातून 18 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे. पेंच 4 जलशुद्धीकरण केंद्रामध्ये मंगळवारी सकाळी 10 ते बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पेंच 4 जलशुद्धीकरण केंद्रातून ज्या परिसराला पाणी पुरवठा केला जातो, तिथे जलवाहिन्यांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
36 तासांच्या पाणी पुरवठा बंदच्या काळामध्ये, मानकापूर नाल्याजवळ 1400 बाय 1400 मिलिमीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्यांच्या परस्परजोडणीचे काम आणि वाहिनी स्थलांतराचे काम केले जाणार आहे. शिवाय, ओंकारनगर न्यू ईएसआर येथील इनलेट फ्लो मीटर (प्रवाह मापक) बदलण्याचे काम केले जाणार आहे. पाणी पुरवठा बंदचा फटका नारा, नारी, जरीपटका, धंतोली, लक्ष्मीनगर न्यू, श्रीनगर, नालंदानगर, ओंकार नगर, हुडकेश्वर, सक्करदरा, बिडीपेठ, बालाजी नगर आणि डबल डेकर याशिवाय हुडकेश्वर-नरसाळा ग्रामीण भाग आणि गोधनी ग्रामपंचायत परिसराला बसण्याची शक्यता आहे.
मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ...
पेंच- 1 जलशुद्धीकरण केंद्रात 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 7 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत असा 18 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दोन एचटी पंप नॉन-रिटर्न व्हॉल्व्हची दुरुस्ती किंवा बदल करण्यात येणार आहे. शिवाय, मोक्षधाम चौकातील जीएच-मेडिकल फीडरवर व्हॉल्व्ह बसवणे आणि जीएच-ओंकार फीडरवरील एअर व्हॉल्व्ह बदलणे, हे महत्त्वाचे कामं यावेळी केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, नवेगाव खैरी येथील 33 केव्ही एनएमसी पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अशा पाच तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहील. या बंद दरम्यान एनएमसी-ओसीडब्ल्यू भूमिगत केबल किट बदलणार असून, टॉप क्लिप बसवणार आहे आणि झाडांच्या फांद्या कापण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
नागपूर : वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक ...
पेंच-1 केंद्रातील शटडाउनमुळे जीएच-बुलडी, वंजारीनगर जुना आणि नवीन, रेशीमबाग, हनुमाननगर, जीएच-मेडिकल, गोडरेज आनंदम, जीएच-बोरियापुरा, जीएच-वाहन ठिकाणा, जीएच-मध्य रेल्वे, बेझनबाग, जीएच-राजनगर आणि जीएच सदर भाग प्रभावित होतील. नवेगाव खैरी येथील कामामुळे लक्ष्मीनगर जुना, गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला, तकलीसीम, त्रिमूर्तीनगर, जयताळा, रामनगर, सिव्हिल लाइन्स डीटी, रायफल लाइन, फुटाळा लाइन, डाभा, सेमिनरी हिल्स, चिचभवन, टेकडीवाडी, बुलडी फोर्ट-1 आणि 2, किल्ला महाल, बोरियापुरा, गिट्टीखदान आणि गोरेवाडा परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरकरांना आधीच पुरेल तितका पाणी पुरवठा भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर महानगर पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.