Ahilyanagar Crime : दारूच्या व्यसनावरून वाद टोकाला ! आई-वडिलांच्या मारहाणीत 25 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ahilyanagar Crime : मुलांनी शिकून मोठं व्हावं, चांगल्या मार्गावर जावं यासाठी आई-वडील आयुष्यभर कष्ट करतात. मात्र, मुलाला व्यसनाची लागण झाल्यानंतर घरातील परिस्थिती किती टोकाला जाऊ शकते, याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात समोर आला आहे. दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादातून आई-वडिलांनी आपल्या २५ वर्षीय मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह शेतात नेऊन जाळल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मृत तरुणाचे नाव प्रवीण प्रकाश लांडगे (वय २५) असे आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील गुणवडी शिवारात समोर आली आहे.



दारूच्या व्यसनावरून घरात वारंवार वाद


पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीणला दारूचे व्यसन होते आणि तो आई-वडिलांसोबतच राहत होता. दारूच्या कारणावरून त्याचे आई-वडिलांसोबत वारंवार वाद होत होते. मागील आठवड्यात प्रवीण दारू पिऊन घरी आला होता. त्याला दारू प्यायलेले पाहून वडिलांचा संताप झाला. त्यानंतर आई-वडिलांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत प्रवीण गंभीर जखमी झाला.






उपचाराऐवजी घरातच ठेवले अन्...


मारहाणीनंतर प्रवीण गंभीर जखमी झाला होता. मात्र, त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी घरातच ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दोन दिवस उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही हा प्रकार पोलिसांना किंवा इतर कोणालाही न सांगता रविवारी पहाटेच्या सुमारास मृतदेह घरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या शेतात नेण्यात आला. तेथे मृतदेह जाळल्याचा आरोप आहे.



जळालेले अवशेष आणि हाडे पोलिसांच्या हाती


या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी पंचनामा केला असता शेतात जळालेले अवशेष आणि हाडे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी आई-वडिलांची कसून चौकशी केली. चौकशीत संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. आई-वडिलांनी मुलाच्या हत्येची कबुली दिल्याचे एपीआय गणेश वारुळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

BMC Action : मालाड येथील नाहर नगर मार्गाचे रुंदीकरण,अडथळा आणणारी १७ बांधकामे हटवली, ‘पी पश्चिम’ विभागाची कारवाई*

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पी पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ४६ मधील नाहर नगर मार्ग येथे प्रस्तावित १८.३० मीटर

Eknath Shinde : पर्यावरण जनजागृतीसाठी राज्यभर फिरणार 5 विशेष रथ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण

Jijai Movie : स्त्रीशक्तीचा धगधगता अवतार! रिंकू राजगुरूचा ‘जिजाई’ चित्रपटगृहांत दाखल

मुंबई :  घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबासाठी सतत धडपडणारी स्त्री स्वतःच्या सुरक्षिततेसाठी,

Drug Department : औषध विभागाची सात महिन्यांत मोठी कारवाई; 17.73 कोटींचा साठा जप्त, 555 परवाने रद्द

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) औषध विभागाने 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2026 या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील

PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

Maharashtra News: पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी

Railway Block : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी 7 दिवस विशेष ब्लॉक; मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा