Nitesh Rane: यवतमाळातील दुष्काळी परिस्थितीची नितेश राणे यांनी केली पाहणी, मच्छीमार बांधवांना मदतीची दिली ग्वाही

यवतमाळ: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही तलाव क्रमांक २ येथे प्रत्यक्ष भेट देऊन तलावाची पाहणी केली. यावेळी उपस्थित मच्छीमार बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, मत्स्यव्यवसायावर झालेला परिणाम तसेच त्यांच्या विविध मागण्या जाणून घेतल्या.


गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे तलाव व जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. याचा थेट परिणाम मत्स्यव्यवसायावर झाला असून मच्छीमार बांधवांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती गांभीर्याने लक्षात घेऊन मच्छीमार बांधवांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही यावेळी नितेश राणे यांनी दिली.



जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी होते. त्यामुळे जलाशयांची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढण्याच्या कामासंदर्भात संबंधित यंत्रणांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना राणे यांनी दिले.


 


यावेळी नागरिक व मच्छीमार बांधवांकडून विविध निवेदने स्वीकारून त्यांच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत उपलब्ध विविध योजनांचा मच्छीमार बांधवांनी प्रभावीपणे लाभ घ्यावा, असे आवाहनही नितेश राणे यांनी केले.



दुष्काळी परिस्थितीत मच्छीमार बांधवांच्या अडचणी शासनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असून, त्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. मत्स्यव्यवसायावर निर्माण झालेल्या संकटातून मच्छीमार बांधवांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.


याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आरतीताई फुफाटे, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा कायम! पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदे भेटीत काय घडलं?

मुंबई: विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील तिढा अद्याप कायम असल्याचे

Maharashtra Drought: दुष्काळी कामांसाठी आमदार निधीतून करणार मदत, टंचाई निवारणासाठी सरकारचा निर्णय

मुंबई: राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाईग्रस्त भागांमध्ये तातडीच्या उपाययोजना

BJP News: भाजप युवा मोर्चाची नवी टीम जाहीर, 29 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई: युवा संघटन अधिक बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सोमवारी युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर

Nitesh Rane: दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांचा विदर्भ दौरा

वाशिम: महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत जलाशय आणि तलावातील पाणीसाठा कमी असल्यामुळे

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय; ताजा, सकस आहार वेळेत मिळण्यासाठी केल्या उपाययोजना

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाला आणि महिला- बालविकास विभागाला, 'प्रधानमंत्री पोषण

एमपीएससीचे आजी-माजी अध्यक्ष, सदस्यांच्या चौकशीसाठी समिती - कलम ३१७नुसार कारवाईची शिफारस

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे