
ठाणे: मध्य रेल्वेवरील आसनगाव- कसारा मार्गावर तिसरी मार्गिका आणि कसारा यार्ड विस्तारीकरणासाठी विशेष ट्रॉफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळामध्ये, लोकल, मेल आणि एक्स्प्रेस रद्द, रूटमध्ये बदल किंवा शॉर्ट टर्मिनेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या अनेक मेल- एक्स्प्रेसला विशेष ब्लॉकचा फटका बसणार आहे. तीन दिवसांच्या या ब्लॉकच्या काळामध्ये आसनगाव- कसारा मार्गावरील प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच आपल्या प्रवाशाचं टाईमटेबल बनवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
7 ऑक्टोबर 2026 ते 18 ऑक्टोबर 2026 या दिवसांमध्ये आसनगाव- कसारा मार्गावर तिसऱ्या मार्गिकेचा प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या अनुषंगाने कसारा स्थानकावर 12 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीमध्ये अनेक रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. बुधवार 7 ऑक्टोबर आणि गुरूवार 8 ऑक्टोबर रोजी, दुपारी 03.35 वाजेपासून ते रात्री 08.35 वाजेपर्यंत आणि 9 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 05.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. कसारा- खर्डी आणि उंबरमाळी- कसारा दरम्यानची 'अप' मेन लाईन आणि 'डाऊन' मेन लाईन तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 3, 4 आणि 'अप' यार्डवर विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.
खोपोली : मिसिंग लिंकवर आज पहाटेपासून दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने ...
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यान, ब्लॉक कालावधीत लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. 7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर रोजी, मुंबई CSMT येथून दुपारी 01.10, 02.17, 02.46 आणि 04.50 वाजता सुटणाऱ्या मुंबई CSMT- कसारा लोकल सेवा आसनगावपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. तर, कसारा स्थानकावरून दुपारी सुटणारी 03.35, 04.16, 05.02, 06.17 वाजता सुटणाऱ्या कसारा- मुंबई CSMT उपनगरीय रेल्वे सेवा अनुक्रमे 04.12, 04.54, 05.39, 06.54 वाजता आसनगाव स्थानकातून सुटणार आहे.
मध्य रेल्वेद्वारे आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका आणि कसारा यार्ड विस्तारीकरणाच्या कामासाठी कसारा येथे दिनांक ०७ ते ०९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे.
या कालावधीत काही मेल/एक्सप्रेस, उपनगरीय गाड्यांचे रद्दीकरण, नियमन आणि शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजीनेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी बदललेले वेळापत्रक तपासूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. #CentralRailway #IndianRailways #Megablock #Kasara — Central Railway (@Central_Railway) October 4, 2026
7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर रोजी, ब्लॉकपूर्वी डाऊन नॉर्थ ईस्ट' मार्गावरून कसारा स्थानकावर जाणारी शेवटची लोकल मुंबई CSMT स्थानकावरून दुपारी 12:30 वाजता सुटेल. तर, ब्लॉकपूर्वी 'अप नॉर्थ ईस्ट' मार्गावर मुंबई CSMT साठी शेवटची लोकल कसारा स्थानकावरून दुपारी 02.42 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर 'डाऊन नॉर्थ ईस्ट' मार्गावर कसारा स्थानकाकडे जाणारी पहिली लोकल मुंबई CSMT स्थानकावरून सायंकाळी 06.28 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर 'अप नॉर्थ ईस्ट मार्गावर मुंबई CSMT स्थानकाकडे जाणारी पहिली लोकल कसारा स्थानकावरून रात्री 08.35 वाजता सुटेल.
मुंबई : मुंबई आणि बंगळूरु दरम्यान जलद रेल्वे सेवेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन ...
दिनांक 08 आणि 09 ऑक्टोबर 2026 (गुरुवार / शुक्रवार मध्यरात्र) रोजी ब्लॉक कालावधीत अनेक लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहे. मुंबई CSMT स्थानकावरून 08 ऑक्टोबर रोजी रात्री 10.47 वाजता आणि 09 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12.08 वाजता सुटणारी मुंबई CSMT- कसारा लोकल, टिटवाळा स्थानकावरून 08 ऑक्टोबर 2026 रोजी 10:14 वाजता सुटणारी टिटवाळा- ठाणे लोकल, कसारा स्थानकावरून 09 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 03:51 वाजता सुटणारी कसारा- मुंबई CSMT लोकल रद्द केल्या जाणार आहे.
दिनांक 08 आणि 09 ऑक्टोबर 2026 (गुरुवार / शुक्रवार मध्यरात्र) रोजी 'डाऊन नॉर्थ ईस्ट' मार्गावर कसारासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल मुंबई CSMT स्थानकावरून रात्री 09.32 वाजता सुटेल. 'अप नॉर्थ ईस्ट' मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वीची शेवटची उपनगरीय रेल्वे सेवा कसारा स्थानकावरून रात्री 10.00 वाजता सुटेल. 'डाऊन नॉर्थ ईस्ट मार्गावर कसारासाठी ब्लॉकनंतरची पहिली उपनगरीय रेल्वे सेवा मुंबई CSMT स्थानकावरून पहाटे 04:19 वाजता सुटेल. 'अप नॉर्थ ईस्ट' मार्गावर मुंबई CSMTसाठी ब्लॉकनंतरची पहिली उपनगरीय रेल्वे सेवा कसारा येथून पहाटे 04:59 वाजता सुटेल.
दरम्यान, लांब पल्ल्याच्या मेल- एक्स्प्रेसच्या वेळापत्रकालाही ब्लॉकचा फटका बसणार आहे. ब्लॉकच्या कालावधीमध्ये कशापद्धतीने मेल- एक्स्प्रेस चालवल्या जाणार आहे, याबद्दलची अपडेट मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या एक्स अकाऊंटवर सर्व माहिती सहज उपलब्ध होईल.




