
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि माजी विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने, भारतीय महिला संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता तिच्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाला नवीन कर्णधार मिळाली आहे. आतापासून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मंधाना झाली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने भारतीय प्लेइंग 11 घोषणा केली. या घोषणेनंतर क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना उधाण ...
महिला क्रिकेट संघाची नवी कर्णधार कोण याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरु होती, अखेर याचं उत्तर भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना मिळालं आहे. स्मृती गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटमधील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तिची भारतीय महिला संघाच्या सर्व फॉरमॅटमधील प्रगती पाहता तिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून, तिने देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्येही आपले नेतृत्वगुण दाखवले आहेत आणि अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला 2024 आणि 2026 मध्ये महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे.
🚨 News 🚨
Here's #TeamIndia women's T20I and ODI squads under Smriti Mandhana's first series as full-time captain 👏 More Details ▶️ https://t.co/jW53GaoweG #INDvZIM | @mflone_ | @mandhana_smriti https://t.co/4zOhFgDO7h — BCCI Women (@BCCIWomen) October 6, 2026
2013 पासून भारतीय संघाचा भाग असलेल्या स्मृतीला भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. संघ एका नवीन टप्प्यात प्रवेश करत असून, गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रगतीवर पुढे वाटचाल करत असताना, आता स्मृती संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारेल. जरी ती आतापासून पूर्णवेळ व्हाईट- बॉल कर्णधार असली तरी, स्मृतीने आतापर्यंत 18 T-20 आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला टी20 सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या निर्णयानंतर ...
स्मृती मंधाना म्हणाली की, "भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळणे हा एक अत्यंत विशेष सन्मान आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाची गोष्ट राहिली आहे आणि आता संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत मोलाची बाब आहे. बीसीसीआय, निवड समिती, माझे सहकारी खेळाडू आणि माझ्या प्रवासात मला साथ देणाऱ्या तसेच माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या प्रत्येकाची मी आभारी आहे.
Honoured. Grateful. Ready. 💙
@mandhana_smriti reflects on the immense pride of becoming #TeamIndia Captain and carrying the legacy forward 🫡🇮🇳 https://t.co/qFooagUeJr — BCCI Women (@BCCIWomen) October 6, 2026
मंधाना पुढे म्हणाली की "हरमनप्रीत आणि तिने गेल्या काही वर्षांत कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानाचीही मी दखल घेऊ इच्छिते. तिने अत्यंत निष्ठेने संघाचे नेतृत्व केले आहे आणि ती आमच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे.या भूमिकेसोबत येणारी जबाबदारी मला समजते. संघासोबत काम करण्यास, त्यातून शिकण्यास आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी माझे सर्वोत्तम योगदान देण्यास मी उत्सुक आहे."






