Monday, October 5, 2026

Mumbai Mayor : कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांच्या निवासस्थानी मुंबईच्या महापौरांनी दिली सदिच्छा भेट

आकाशात ३५ हजार फुटांवर कॉकपिटमध्ये सह-वैमानिकाकडून झालेल्या प्राणघातक चाकूहल्ल्यात गंभीर जखमी असतानाही, अतुलनीय शौर्य दाखवून २७ निष्पाप बालकांसह तब्बल १८० प्रवाशांचे प्राण सुखरूप वाचवणारे फ्लाय दुबईचे धाडसी पायलट, मूळ मुंबईकर असणारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांची मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी ४ ऑक्टोबर २०२६ रोजी भेट घेतली.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबईतील घाटकोपर (पूर्व) येथील 'धवलगिरी' इमारतीत वास्तव्यास असणारे कॅप्टन स्मित यांचे चुलते किशोर मच्छार यांच्या निवासस्थानी जाऊन महापौरांनी भेट घेतली. त्यावेळी स्मित यांच्या प्रकृतीची माहिती घेत आस्थेने विचारपूस केली. स्मित यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली.

विशेष म्हणजे, मच्छार कुटुंबीयांचे हे निवासस्थान ज्या प्रभागात येते, तो प्रभाग क्रमांक १३२ हा स्वतः महापौर रितू तावडे यांचा नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व असलेला प्रभाग आहे. आपल्याच नगरसेवक प्रभागातील आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या सुपुत्राच्या कुटुंबियांची भेट घेत महापौरांनी संपूर्ण प्रभाग आणि मुंबईकरांच्या वतीने मच्छार कुटुंबियांना पाठबळ दिले.

याप्रसंगी आमदार पराग शाह, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका राखी जाधव यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात ३० सप्टेंबर रोजी घडलेल्या जीवघेण्या प्रसंगात कॅप्टन स्मित मच्छार यांनी रक्ताच्या थारोळ्यात असतानाही असीम संयम दाखवत आणि विमानाचे यशस्वी इमर्जन्सी लँडिंग करून नवा इतिहास घडवला. त्यांच्या या धाडसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी कौतुक केले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी मच्छार कुटुंबीयांशी संवाद साधत कॅप्टन स्मित यांच्या उपचारांची व प्रकृतीत होत असलेल्या सुधारणेची माहिती जाणून घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा