Kiara And Siddharth Second Child : 'कुणीतरी येणार येणार गं...' कियारा-सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा; लाडक्या लेकीसोबत केली सेकंड प्रेग्नेंसीची घोषणा!

पहिल्या अपत्यप्राप्तीनंतर अवघ्या एका वर्षाच्या आत या दांपत्याने आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक आणि खास छायाचित्र शेअर करत त्यांनी चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. या बातमीमुळे त्यांचे चाहते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुंबई : बॉलिवूडचे लाडके जोडपे अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Adwani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (siddharth Malhotra) यांच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. पहिल्या अपत्यप्राप्तीनंतर अवघ्या एका वर्षाच्या आत या दांपत्याने आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक आणि खास छायाचित्र शेअर करत त्यांनी चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. या बातमीमुळे त्यांचे चाहते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सिद्धार्थ, कियारा आणि त्यांची पहिली मुलगी साराया (Saraayah) या तिघांचे हात एकत्र दिसत असून, त्यावर लहान बाळाचे मोजे ठेवलेले पाहायला मिळत आहेत. "आम्हाला पुन्हा एकदा आयुष्यातील सर्वात सुंदर भेट मिळाली असून आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरून आले आहे," असे सुंदर कॅप्शन त्यांनी या छायाचित्राला दिले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही त्यांनी अशाच अनोख्या शैलीत पहिल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. १५ जुलै २०२५ रोजी कियाराने तिच्या पहिल्या लेकीला जन्म दिला होता.


आपल्या पहिल्या बाळानंतर कियाराने लगेचच कामावर लक्ष केंद्रित केले होते. साऊथचा सुपरस्टार यश याच्यासोबतच्या 'टॉक्सिक' या चित्रपटात ती नुकतीच झळकली होती. एका पॉडकास्ट मुलाखतीत मातृत्वाबद्दल बोलताना कियाराने सांगितले होते की, आई झाल्यानंतर तिच्या आयुष्यात आणि स्वभावात प्रचंड बदल झाला आहे. मातृत्वाने तिला अधिक कणखर आणि जबाबदार बनवले असल्याचे तिने नमूद केले होते. आता पुन्हा एकदा हे स्टार कपल आई-बाबा होणार असल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

Comments
Add Comment

Kalyani Sadanand : अभिनेत्री कुनिका सदानंद यांच्या आईचं निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका सदानंद (Kunika Sadanand) ह्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुनिका यांनी

यामी गौतम मुंबई सोडणार? मंडीतील 100 वर्षे जुन्या अलिशान बंगल्याची किंमत ऐकून डोळे विस्फारतील; पाहा Photos...

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड कपल यामी गौतम आणि आदित्य धर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.

Shreya Ghoshal : श्रेया घोषालच्या कॉन्सर्टचा मुंबईत धमाका! २० हजारांचे तिकीट; 'The Unstoppable Tour' ची जोरदार चर्चा!

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि गानकोकिळा श्रेया घोषालच्या (Shreya Ghoshal) चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदवार्ता आहे. श्रेया घोषाल

Arijit Singh : अरिजीत सिंगची संगीतातील २० वर्षे : पार्श्वगायनातून निवृत्तीनंतर भव्य 'इंडिया टूर'ची घोषणा

जानेवारी २०२७ पासून ९ शहरांमध्ये रंगणार धमाकेदार कॉन्सर्ट्स पार्श्वगायक अरिजीत सिंग (Arijit Singh) आपल्या

Gondhal Movie Screening: ‘गोंधळ’ चित्रपट पाहायचाय का? 9 ऑक्टोबरपासून देशभरातील ‘या’ 6 शहरांमध्ये होणार स्पेशल शो

मुंबई: संतोष दावखर दिग्दर्शित, 'गोंधळ' या सायकोलॉजिकल थ्रिलर मराठी चित्रपटाची 99 व्या अकादमी पुरस्कारांसाठी

'Drishyam 3'ची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड; पटकथा लिहिण्यासाठी १०० हून अधिक ड्राफ्ट, चित्रपटाचा क्लायमॅक्स ठेवला गुप्त

अजय देवगणचा बहुप्रतीक्षित असलेला दृश्यम द कन्क्लुजन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. पहिल्या दोन