Tuesday, October 6, 2026

वेस्ट इंडिजला पहिल्या टी20 सामन्यात भारताने लोळवलं, 171 धावांचं आव्हान सहज गाठलं

टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली. वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारताने सहज गाठलं.

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि वेस्ट इंडिजच्या वाटेला फलंदाजी आली. वेस्ट इंडिजने 19.1 षटकात सर्व गडी गमवून 171 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान भारताने सहज गाठलं. यासह पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाची जबरदस्त खेळी 

वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर 171 धावांचे आवाहन ठेवले होते. कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाने अवघ्या काही तासांतच संपूर्ण खेळ आटोपला आहे. 2 विकेटने टीम इंडियाने पहिली टी- 20 मॅच आपल्या खिशात टाकली आहे.

वेस्ट इंडिजचा डाव 

वेस्ट इंडिजच्या डावाची डळमळीत झाली. या सामन्यातून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ओपनर कामिल पूरन 12 धावांवर बाद झाला. तर शिमरॉन हेटमायर 5 आणि रोवमन पॉवेल खातंही खोलू शकला नाही. मात्र, दुसऱ्या बाजूने कर्णधार सलामीवीर आणि यष्टिरक्षक शाय होप याने डावाची धुरा सांभाळत 37 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 52 धावांची खेळी केली. त्याला मधल्या फळीतील शेरफेन रदरफोर्डची उत्तम साथ मिळाली. त्याने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 34 चेंडूंत 56 धावा कुटल्या. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोस्टन चेस 5, रोमारिओ शेफर्ड 7, मॅथ्यू फोर्ड 2, शमार स्प्रिंगर 9 आणि अकेल होसेन 15 अशा धावा करून बाद झाले. तर शमार जोसेफ शून्य धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजला अतिरिक्त 8 धावा मिळाल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >