उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. चैतन्य विहार येथील एका संस्कृत शाळेत (गुरुकुल) जमिनीखालील पाण्याची टाकी साफ करताना विषारी वायूची बाधा होऊन चार निष्पाप विद्यार्थ्यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दुर्गंधी घालवण्यासाठी उतरले होते टाकीत
मिळालेल्या माहितीनुसार, या गुरुकुलच्या आवारात सुमारे १२ ते १४ फूट खोल पाण्याची टाकी आहे. या टाकीतून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने विद्यार्थ्यांनी ती साफ करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मोटर लावून टाकीतील बहुतांश पाणी बाहेर काढले. त्यानंतर उरलेला गाळ व कचरा साफ करण्यासाठी एक विद्यार्थी टाकीत उतरला. मात्र, टाकीत आधीपासूनच साचलेल्या घातक विषारी वायूमुळे तो काही क्षणांतच बेशुद्ध पडला.
सोबत्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुर्घटना घडली
#WATCH | Vrindavan, UP: SSP Shlok Kumar says, "Information was received a short while ago regarding an institution in the Vrindavan police station area—specifically the 'Vrindavan Gurukulam'—which operates as a residential facility where children live and study. There is a water tank on the premises that was emitting a foul odor; children from the institution went down to clean it. When the first boy descended, he did not come back out, prompting four other boys to go in after him. When they failed to emerge, people present at the scene managed to pull them out. They were brought to the hospital for treatment... One boy who had entered the tank survived and is safe; he has been referred to another facility from this hospital... CCTV cameras are installed at the site of the incident and are being examined; further action will be taken based on the formal complaint lodged by the families once contact is established with them."
— ANI (@ANI) October 6, 2026
आपला मित्र आत बेशुद्ध पडल्याचे पाहून, त्याला बाहेर काढण्यासाठी आणि वाचवण्यासाठी इतर चार विद्यार्थ्यांनी एकापाठोपाठ एक टाकीत प्रवेश केला. परंतु, टाकीतील विषारी वायूचा प्रभाव अत्यंत तीव्र असल्याने, वाचवायला गेलेले चारही विद्यार्थीदेखील तिथेच बेशुद्ध झाले. हा प्रकार तेथील लोकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने धावपळ करत पाचही जणांना बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांकडून चार जणांना मृत घोषित
#WATCH | Vrindavan, UP: Four students died after allegedly being overcome by toxic gas while cleaning a water tank. https://t.co/a03YbS32aa
— ANI (@ANI) October 6, 2026
रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी चार विद्यार्थ्यांना तपासून मृत घोषित केले. या मृत विद्यार्थ्यांचे वय १७ ते २० वर्षांदरम्यान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर या अपघातात 'रुद्र' नावाचा एक विद्यार्थी सुदैवाने वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर असून तो शुद्धीवर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून त्यांच्या पालकांना या दुर्दैवी घटनेची माहिती देण्यात आली आहे.
दंडाधिकारी चौकशीचे आदेश
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बाधित विद्यार्थ्यांना तातडीने मदत व योग्य उपचार पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी चंद्रप्रकाश सिंग यांनी या प्रकरणाच्या दंडाधिकारी चौकशीचे (Magisterial Inquiry) आदेश दिले आहेत. या चौकशीत गुरुकुलला शासनाची अधिकृत मान्यता होती का, तसेच लहान विद्यार्थ्यांना अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने पाण्याच्या टाकीत का उतरवण्यात आले, या सर्व बाबींची चौकशी केली जाईल. तसेच परिसरातील इतर सर्व संस्थांचे सुरक्षा ऑडिट केले जाईल आणि सीसीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.