
मुंबई : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गरबा आणि रास उत्सवांमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, तसेच गरबा मंडपांमध्ये अश्लील गाणी किंवा चित्रफिती वाजवू नयेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्तीच्या वतीने करण्यात आली. गरबा आयोजकांनी उत्सवाच्या स्वरूपाबाबत आणि गाण्यांच्या निवडीबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
गरबा उत्सवाच्या ठिकाणी महिलांची आणि मुलींची मोठी उपस्थिती असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आयोजकांनी कठोर नियमांचे पालन करावे, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने मांडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि चित्रफितींच्या आधारे मुलींना आकर्षित करून त्यांना जाळ्यात ओढले जात असल्याचा दावाही परिषदेकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पालकांनी मुलांशी संवाद ठेवावा आणि त्यांच्या दैनंदिन हालचालींबाबत जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज (८ ऑक्टोबर २०२६) पहाटे गोव्यातील दोना पावला येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मनोरंजन विश्वावर या बातमीने ...
गरबा हा धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला उत्सव असल्याने त्याचे स्वरूप आणि वातावरण राखण्याची जबाबदारी आयोजकांवर आहे, असेही परिषदेकडून सांगण्यात आले. गरबा मंडपांमध्ये अश्लील गाणी किंवा चित्रफिती न दाखवता कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, गरबा उत्सवाच्या संदर्भात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचा मुद्दाही विश्व हिंदू परिषदेने उपस्थित केला. हिंदू महिला आणि मुलींना लक्ष्य केले जाते. त्यामुळे आयोजक आणि पालकांनी मुलींच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.





