
नाशिक: अवघ्या काही दिवसांवर नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विकास कामं केली जात आहे. येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहन करून नाशिक- त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्याला सुरूवात होणार आहे. आता अशातच कुंभमेळ्याच्या आधी त्र्यंबकेश्वर मंदिराचे विकास कामं हाती घेण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याआधी त्र्यंबकेश्वर मंदिरातील काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 2 महिने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकी अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नसून येत्या काही दिवसांमध्ये तारीख करण्यात येणार आहे.
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून प्रक्रिया न करता दूषित सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जलप्रदूषण करणाऱ्या ...
त्र्यंबकेश्वर मंदिर नेमकं केव्हापासून बंद होणार आहे? याची माहिती मंदिर प्रशासनाने किंवा राज्य शासनाने अजूनही दिलेली नाही. पण त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील 2 महिने बंद राहणार असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिर येत्या 15 ऑक्टोबर 2026 किंवा 16 ऑक्टोबर 2026 पासून बंद राहण्याची शक्यता नाही. लवकरच मंदिर प्रशासनाकडून आणि राज्य शासनाकडून अंतिम तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहन करून नाशिक- त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्याला सुरूवात होणार आहे. त्या अनुषंगाने आता मंदिर प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे.
मुंबई : खरीप हंगामातील दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे ११ सदस्यांचे आंतरमंत्रालयीन पथक महाराष्ट्रात ...
दरम्यान, नाशिक सिंहस्थ महाकुंभासाठी देशासह जगभरातून करोडो भाविक येणार आहेत. त्या दृष्टीनेच जिल्हा प्रशासनाकडून आणि राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे अमृत स्नानासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शासनाकडून अनेक वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. भाविकांची गर्दी, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचे आव्हान लक्षात घेऊन नाशिक शहर पोलिसांनी विशेष नियोजन सुरू केले आहे. मागील कुंभमेळ्यात पर्वणीच्या काळात भाविकांना मोठ्या प्रमाणावर पायपीट करावी लागली होती. त्यामुळे यंदा वाहनतळापासून स्नानाच्या घाटापर्यंतचे अंतर कमीत कमी ठेवण्यावर पोलिसांचा विशेष भर आहे. भाविकांच्या आणि साधु महंतांच्या दृष्टीने सर्व उपाययोजना आखल्या जात आहेत.





