Hong Kong Sixes: 30 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, पीसीबीकडून संघाची घोषणा
Hong Kong Sixes 2026: हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. इतकंच काय पाकिस्तानने या स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे.
October 9, 2026 01:33 PM
Hong Kong Sixes: 30 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, पीसीबीकडून संघाची घोषणा (Photo: Cricket Hong Kong, China Twitter)
हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेला 31 ऑक्टोबरपासून सुरुवात होणआर आहे. ही स्पर्धा तीन दिवसांची असून 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या दरम्यान खेळवली जाईल. हा क्रिकेटचा सर्वात वेगवान प्रकार आहे. यात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सहा खेळाडू असतात आणि सामना सहा षटकांचा असतो. या वेगवान स्पर्धेची सुरुवात 1992 मध्ये झाली. पहिलीवहिली स्पर्धा पाकिस्तानने जिंकली होती. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटचा उदय होण्यापूर्वीच्या काळात ही स्पर्धा क्रिकेट जगतात आकर्षणाचे केंद्र ठरली होती. या स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान हा सर्वात यशस्वी संघ आहे. पाकिस्तानने आतापर्यंत सर्वाधिक सहा वेळा (1992, 1997, 2001, 2002, 2011 आणि 2025) हे जेतेपद मिळवले आहे. त्याखालोखाल इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी प्रत्येकी पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने 2026 मध्ये श्रीलंकेला हरवून एकदा हॉंगकॉंग सिक्ससचे विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार आहेत.
भारत पाकिस्तान सामना कधी?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. मागच्या पर्वात पाकिस्तान संघाची कामगिरी जबरदस्त राहिली. साखळी फेरीत भारताने पाकिस्तानला 2 धावांनी पराभूत केलं होतं. पण पाकिस्तानने दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत कुवैतचा 43 धावांनी पराभव केला आणि जेतेपदावर नाव कोरलं होतं. मागच्या पर्वात भारताची कामगिरी हवी तशी झाली नाही. पाकिस्तानला नमवलं, पण कुवैतविरुद्ध 27 धावांनी पराभव झाला. त्यानंतर बाऊल फेरीत युएई आणि श्रीलंकेकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आणि स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला होता. मागच्या पर्वात दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात भारतीय संघ हाँगकाँग स्पर्धेत गेला होता. दिनेश कार्तिक, आर अश्विन, रॉबिन उथप्पा, स्टुअर्ट बिन्नी, भरत चिपली, अभिमन्यू मिथून, शाहबाज नदीम आणि प्रियांक पांचाल यांची निवड झाली होती.
काय आहेत स्पर्धेचे नियम?
विकेटकीपर व्यतिरिक्त उर्वरित सर्व 5 खेळाडूंना प्रत्येकी 1 षटक गोलंदाजी करणे बंधनकारक असते. एका फलंदाजाने 50 धावा पूर्ण केल्यास त्याला 'रिटायर नॉट आऊट' व्हावे लागते. जर शेवटचा फलंदाज शिल्लक राहिला, तर बाद झालेला खेळाडू फक्त धावपटू म्हणून सोबत राहून शेवटच्या फलंदाजाला फलंदाजी करता येते. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, ब्रायन लारा, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी भाग घेतला आहे.
हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेतील गट
• गट अ (Group A): ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, हॉंगकॉंग
• गट ब (Group B): बांगलादेश, स्कॉटलंड, श्रीलंका
• गट क (Group C): पाकिस्तान, भारत, युएई (UAE)
• गट ड (Group D): अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने गुरूवारी पहाटे त्यांचं निधन झालं. त्यांच्या ...
पहिला दिवस: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026 (गट फेरी सामने)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध हॉंगकॉंग गट अ सकाळी 6:15
बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड गट ब सकाळी 7:10
पाकिस्तान विरुद्ध युएई गट क सकाळी 8:05
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ओमान गट ड सकाळी 9:00
हॉंगकॉंग विरुद्ध इंग्लंड गट अ सकाळी 9:55
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका गट ब सकाळी 10:50
भारत विरुद्ध पाकिस्तान गट क सकाळी 11:45
ओमान विरुद्ध अफगाणिस्तान गट ड दुपारी 12:40
स्कॉटलंड विरुद्ध श्रीलंका गट ब दुपारी 1:35
बाद फेरी आणि अंतिम सामने
शनिवार, 31 ऑक्टोबर 2026: या दिवशी बाऊल, प्लेट आणि कप स्पर्धांचे उपांत्य (Semi-Final) सामने खेळवले जातील. रविवार, 1 नोव्हेंबर 2026: या दिवशी अंतिम सामने (Finals) खेळवले जातील.
बाऊल फायनल (Bowl Final): हॉंगकॉंग वेळ दुपारी 1:20 (भारतीय वेळ सकाळी 10:50)
प्लेट फायनल (Plate Final): हॉंगकॉंग वेळ दुपारी 2:15 (भारतीय वेळ सकाळी 11:45)
कप फायनल (Cup Final): हॉंगकॉंग वेळ दुपारी 3:10 (भारतीय वेळ दुपारी 12:40)
हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ ठरला
हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास अफ्रिदीच्या नेतृत्वात संघाची घोषणा करण्यात आली आहे. मोहम्मद अब्बास अफरीदी (कर्णधार), अब्दुल समद, अहमद दानियाल, मोहम्मद इरफान खान, ख्वाजा नफे, मोहम्मद शहजाद आणि साद मसूद असा संघ असेल. अजूनही भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे या स्पर्धेत भारताचं नेतृत्व कोण करणार? आणि संघात कोण असेल याची उत्सुकता आहे.