नवरात्रीत ‘जिहादी’ दिसले तर खबरदार! मंत्री नितेश राणे यांचा इशारा

नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांत खोटी ओळख सांगून प्रवेश करण्याचा किंवा हिंदू महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास खबरदार, असा इशारा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला.

मुंबई: नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांत खोटी ओळख सांगून प्रवेश करण्याचा किंवा हिंदू महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास खबरदार, असा इशारा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी दिला. मुंबईतील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


मंत्री राणे म्हणाले, नवरात्रोत्सव हा हिंदूंचा सण असून गरबा आणि दांडियाला सनातन हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी कोणी नाव किंवा ओळख बदलून प्रवेश करण्याचा आणि त्यातून ‘लव्ह जिहाद’चा प्रयत्न केल्यास तो सहन केला जाणार नाही. अशा प्रकारे कोणी महिलांकडे वाईट नजरेने पाहिल्यास आमच्या पोलिसांचे दांड त्यांच्याशी दांडिया खेळतील. मग शुक्रवारी बाहेर पडणेही अवघड होऊन बसेल. दांडिया खेळण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्यांनी आपला मूळ धर्म स्वीकारावा, मूर्तिपूजा करावी, देवीची आरती किंवा हनुमान चालीसा म्हणावी आणि मग उत्सवात सहभागी व्हावे.


गरबा-दांडियाच्या ठिकाणी संशयास्पद ओळख घेऊन येणाऱ्यांवर हिंदुत्ववादी संघटनांचे लक्ष असेल. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असून ‘लव्ह जिहाद’विरोधात सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे राणे यांनी सांगितले. मालाडमध्ये गरबा-दांडियाच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांबाबत विचारले असता, ईद, मोहरम किंवा अन्य धर्मांच्या सणांमध्ये हिंदू जाऊन अडथळे निर्माण करत नाहीत; त्याचप्रमाणे हिंदूंच्या सणांमध्येही कोणी अडथळे आणू नयेत. नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.




ठाकरेंचा हिंदू सणांना विरोध का?


हिंदू सणांच्या काळात देशातील वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचे विधान उद्धव ठाकरे यांनी केल्याबाबत विचारले असता, मंत्री राणे यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. गणेशोत्सवाच्या काळातही दंगली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र गणेशोत्सव शांततेत पार पडला. आमच्या सरकारने त्याबाबत खबरदारी घेतली. आता नवरात्रोत्सव सुरू होत असताना पुन्हा अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. हिंदू सणांच्या वेळीच अशा प्रकारची विधाने का केली जातात? हिंदू सणांच्या वेळी वातावरण तापवण्याचा हा प्रयत्न आहे. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंनी ईद, मोहरम आणि रमजानच्या काळातही असे प्रश्न उपस्थित करावे, असे आव्हानही त्यांनी केले.




अभिजित दीपकेची भाषा दहशतवाद्यांसारखी


अभिजीत दीपके याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा मंत्री नितेश राणे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी वापरली जाणारी भाषा दहशतवाद्यांसारखी आहे. दीपके याची भूमिका नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात आहे. सध्याच्या त्याच्या आंदोलनामागे उमर खालिद याच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचा हेतू दिसून येतो. काल विमानात दीपके आणि त्याच्या सहकाऱ्यांनी भारतमातेच्या जयघोषाला विरोध करणाऱ्या घोषणा दिल्या. दीपके, सौरभ दास आणि अन्य काही व्यक्ती या आंदोलनातील मुखवटे असून, त्यांचा संबंध उमर खालिदच्या समर्थकांशी असल्याचा आरोपही मंत्री राणे यांनी केला.

Comments
Add Comment

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान

Weather Update : मान्सून गेला, घाम फुटला! महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा; 5 जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी

मुंबई :

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा सुरळीतपणे पुरवठा करण्याचे निर्देश

महाराष्ट्र: राज्यातील जून ते सप्टेंबर 2026 या कालावधीत पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांमुळे प्रभावित झालेल्या

Cm देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून केलेल्या ‘वारी’ डॉक्युमेंट्रीचा जागतिक स्तरावर सन्मान

महाराष्ट्र: पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी

'व्हीआयपी' पाहुण्यांसाठी राज्य सरकार घेणार 12.68 कोटींच्या गाड्या, वाचा यादी

मुंबई: राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागतासाठी तसेच प्रवासासाठी

Sharad Lad: विधान परिषदेत संधी हुकलेल्या शरद लाड यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेल्या भाजपचे नेते शरद लाड यांची