Saturday, October 10, 2026

Banganga Tank News : बाणगंगा तलावात माशांच्या सामूहिक मृत्यूनंतर खळबळ; पितृपक्षाच्या शेवटी बॅरिकेट्सच्या सावलीत पार पडले शेकडो भाविकांचे श्राद्ध

या घटनेमुळे तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. असे असतानाही, शनिवारी पितृपक्षाच्या अंतिम दिवशी शेकडो भाविकांनी या ऐतिहासिक बाणगंगा तलावाकाठी आपल्या पूर्वजांचे स्मरण करत श्राद्धाचे विधी अत्यंत श्रद्धेने पार पाडले. तलावाचे पाणी दूषित होऊ नये म्हणून प्रशासनाने चोहोबाजूंनी बॅरिकेट्स लावून कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली होती.

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वाळकेश्वर भागातील प्राचीन बाणगंगा तलावात (Mumbai Banganga Tank) काही दिवसांपूर्वी माशांचा सामूहिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमुळे तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. असे असतानाही, शनिवारी पितृपक्षाच्या अंतिम दिवशी शेकडो भाविकांनी या ऐतिहासिक बाणगंगा तलावाकाठी आपल्या पूर्वजांचे स्मरण करत श्राद्धाचे विधी अत्यंत श्रद्धेने पार पाडले. तलावाचे पाणी दूषित होऊ नये म्हणून प्रशासनाने चोहोबाजूंनी बॅरिकेट्स लावून कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली होती.

माशांच्या मृत्यूनंतर पालिकेकडून बॅरिकेट्सची कमान

 
View this post on Instagram
 

A post shared by Sunny Sanap (@sunnysanap)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये शेकडो भाविक या प्राचीन बाणगंगा तलावावर जमल्याचे दिसत आहे. ३ ऑक्टोबर रोजी तलावातील शेकडो मासे अचानक मृतावस्थेत आढळले होते. तलावाच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण खालावल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले. पूजा-अर्चा करताना पाण्यात सोडले जाणारे साहित्य आणि वाढत्या प्रदूषणामुळे पाण्याचा दर्जा बिघडला होता. परिणामी, यंदाच्या पितृपक्षात (२६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर) तलावाच्या पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी महापालिकेने गुरुवारी रात्रीपासूनच तलावाच्या पाण्यात उतरण्यास आणि थेट साहित्य टाकण्यास सक्त मनाई करत बॅरिकेट्स लावले.

भाविकांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी १० कृत्रिम तलावांची निर्मिती

 
View this post on Instagram
 

A post shared by Sunny Sanap (@sunnysanap)

नागरिकांची धार्मिक परंपरा सुरळीत पार पडावी आणि बाणगंगा तलावाचे पर्यावरणही सुरक्षित राहावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक उत्तम तोगा काढला. पालिकेने बाणगंगा परिसरात तब्बल १० कृत्रिम तलाव तयार केले आणि भाविकांना स्नान करण्यासाठी तसेच विधी करण्यासाठी स्वतंत्र नळांची सोय उपलब्ध करून दिली. प्रभाग D-219 चे नगरसेवक सनी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कृत्रिम तलावांमध्ये आणि नळांमध्ये पवित्र बाणगंगा तलावातीलच पाणी भरण्यात आले होते, जेणेकरून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत.

तलावातील ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी ६ विशेष पंप

बाणगंगा तलावातील पाण्याचा बिघडलेला दर्जा सुधारण्यासाठी आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी पालिकेने तलावाच्या पाण्यात ६ अत्याधुनिक ऑक्सिजन पंप बसवले आहेत. गरज भासल्यास आणखीही पंप तातडीने बसवले जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी पालिका अधिकारी, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि बाणगंगेवरील पुरोहित (पुराणीक) यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली होती. या बैठकीत धार्मिक विधी पार पाडतानाच तलावाचे पावित्र्य व पर्यावरण कसे जपायचे, याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आणि पुरोहितांनाही भाविकांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >