Deepika Padukone : मानसिक आरोग्यासाठी पीव्ही सिंधू आणि दीपिका पादुकोण एकत्र! ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूचे कपडे फक्त ८५० रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध

दीपिका पदुकोणच्या 'द दीपिका पदुकोण क्लोजेट' या सामाजिक उपक्रमाचा विस्तार करत आता 'फिचर क्लोजेट' (Featured Closets) हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पीव्ही सिंधूने तिचे खेळताना परिधान केलेले खास जर्सी, जर्सी सेट आणि कपडे मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी दान केले आहेत.

मुंबई : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) यांनी एका अत्यंत स्तुत्य सामाजिक उपक्रमासाठी हातमिळवणी केली आहे. दीपिका पदुकोणच्या 'द दीपिका पदुकोण क्लोजेट' या सामाजिक उपक्रमाचा विस्तार करत आता 'फिचर क्लोजेट' (Featured Closets) हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पीव्ही सिंधूने तिचे खेळताना परिधान केलेले खास जर्सी, जर्सी सेट आणि कपडे मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी दान केले आहेत. विशेष म्हणजे, चाहत्यांना हे कपडे अवघ्या ८५० रुपयांपासून ऑनलाईन खरेदी करता येणार आहेत.



पीव्ही सिंधूच्या सहभागाबद्दल दीपिकाकडून विशेष आभार



१० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त (World Mental Health Day 2026) दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवर या उपक्रमाची अधिकृत घोषणा केली. या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक वॉर्डरोबमधील खास वस्तू दान करण्यासाठी आमंत्रित केले जाते. पीव्ही सिंधू ही या मोहिमेत सहभागी होणारी पहिली पाहुणी ठरली आहे. सिंधूच्या कपड्यांच्या विक्रीतून मिळणारा सर्व निधी 'द लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन' (The Live Love Laugh Foundation) या संस्थेला दिला जाईल, जो मानसिक आरोग्याविषयीचे कार्यक्रम आणि जनजागृतीसाठी वापरला जाणार आहे.



सिंधूचे आभार मानताना दीपिकाने लिहिले :


"पीव्ही सिंधू, आमच्या या उपक्रमातील पहिली पाहुणी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद! संघर्षाशिवाय नेहमी ताकदीची अपेक्षा करणाऱ्या या जगात तुझ्या जिद्दीने, संयमाने आणि कौशल्याने लाखो लोकांना प्रेरित केले आहे."



मानसिक आरोग्यासाठी दीपिकाचा लढा आणि फाऊंडेशनचे कार्य


दीपिका पदुकोणने २०१४ मध्ये स्वतःच्या डिप्रेशनच्या (नैराश्य) अनुभवाबद्दल मोकळेपणाने सांगत सामाजिक स्तरावर मानसिक आरोग्याचा विषय मांडला होता. त्यानंतर २०१५ मध्ये तिने 'द लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन'ची स्थापना केली. या फाऊंडेशनद्वारे मानसिक आरोग्याशी जोडलेला सामाजिक कलंक दूर करणे आणि गरजू घटकांपर्यंत उपचारांची साधने पोहोचवण्याचे काम केले जाते. या विशेष सेलमध्ये सिंधूच्या जर्सी आणि ड्रेसेसची किंमत ८५० रुपये ते १,१०० रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक यात सहभागी होऊ शकतील.



जागतिक मानसिक आरोग्य दिन २०२६ ची संकल्पना (Theme)


दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' पाळला जातो. या वर्षीची संकल्पना (Theme) "अनुभवी आवाज ऐकले: वास्तविक आवाज, वास्तविक बदल" (Lived experiences heard: real voices, real change) अशी आहे. मानसिक आरोग्याबाबत धोरणे आखताना आणि आरोग्य सेवा डिझाइन करताना ज्यांनी स्वतः हा अनुभव घेतला आहे, अशा लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर या वर्षी भर देण्यात आला आहे. केवळ त्यांच्या कथा ऐकण्याऐवजी त्यांच्या अनुभवांना निर्णय प्रक्रियेत स्थान दिले जावे, असा संदेश जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील झगमगाटावर निर्बंध? प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई हे शहर दिवसरात्र गजबजलेलं असतं. रात्रीच्यावेळी मुंबईत खास करून दक्षिण मुंबई तसेच वांद्रे परिसरात झगमगते

Banganga Tank News : बाणगंगा तलावात माशांच्या सामूहिक मृत्यूनंतर खळबळ; पितृपक्षाच्या शेवटी बॅरिकेट्सच्या सावलीत पार पडले शेकडो भाविकांचे श्राद्ध

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वाळकेश्वर भागातील प्राचीन बाणगंगा तलावात (Mumbai Banganga Tank) काही दिवसांपूर्वी माशांचा

Sion railway bridge news : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! सायन रेल्वे उड्डाणपूल अधिकृत उद्घाटनापूर्वीच चर्चेत; सोशल मीडियावरील रीलमुळे पालिका सतर्क

मुंबई : मुंबईतील बहुप्रतिक्षित आणि अतिशय महत्त्वाचा असा सायन रेल्वे उड्डाणपूल (Sion ROB) अजून लोकांच्या वापरासाठी

खाकीचा सन्मान! राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते 103 पोलीस अधिकारी व जवानांना पदके प्रदान

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील लोक भवन येथे एका दिमाखदार

Mumbai Water Supply : धरणातील गाळ काढण्याची गरज... प्रशासनाने दिलेला अभिप्राय स्थायी समितीने परत पाठवला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील गाळ काढून त्यातील पाणलोट क्षेत्र वाढवणे हे

BMC News : सफाई कामगाराची भरती करण्याच्या नावाखाली कामगार संघटनांकडून लाखोंची पावती; सभागृहनेत्यांनी केला आरोप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत सफाई कामगारांना कायम सेवेत घेण्याचा प्रयत्न केला जात असून या