न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी ‘सर जडेजा’ उतरणार मैदानात; रणजी ट्रॉफीसाठी सौराष्ट्रच्या संघात धमाकेदार एन्ट्री

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा पुन्हा रणजी ट्रॉफीच्या मैदानात उतरणार आहे! ‘सर जडेजा’चा समावेश सौराष्ट्रच्या 2026-27 रणजी ट्रॉफी हंगामातील पहिल्या सामन्यासाठी करण्यात आला आहे.



भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा पुन्हा एकदा लाल चेंडूच्या (Red Ball) क्रिकेटमध्ये आपला जलक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. रणजी ट्रॉफी 2026-27च्या पहिल्या सामन्यासाठी सौराष्ट्रच्या 16 सदस्यीय संघात जडेजाचा समावेश करण्यात आला आहे. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली खेळणारा सौराष्ट्र संघ आगामी 11 ऑक्टोबरपासून छत्तीसगडविरुद्ध आपल्या मोहिमेला दणक्यात सुरुवात करणार आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर हा हाय-व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे.



न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी लाल चेंडूचा सराव


नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेत जडेजा भारतीय संघाचा भाग होता. मात्र, त्याला दोन सामन्यांत केवळ दोनच विकेट्स मिळाल्या आणि फलंदाजीची संधी मिळाली नाही. आता भारताला न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची महत्त्वाची मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी रेड बॉल क्रिकेटची लय आणि जुना फॉर्म परत मिळवण्यासाठी जडेजा रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वेलिंग्टन येथे, तर दुसरा कसोटी सामना 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान क्राइस्टचर्च येथे होणार आहे. त्याआधी जडेजाचे रणजी खेळणे टीम इंडियासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.



उनाडकटच्या खांद्यांवर धुरा, युवा खेळाडूंना संधी


रणजी ट्रॉफीच्या 92व्या आवृत्तीची सुरुवात 11 ऑक्टोबरपासून होत आहे. माजी विजेत्या सौराष्ट्र संघाचा समावेश कठीण समजल्या जाणाऱ्या एलिट गट ‘ब’ मध्ये करण्यात आला आहे. मागील हंगामात गट फेरीतच बाहेर पडल्यानंतर, यंदा सौराष्ट्र संघ जोरदार पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरत आहे. संघाचे नेतृत्व अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट करणार आहे. उनाडकट अलीकडेच इंग्लंडमध्ये ससेक्स संघाकडून गाजवून परतला आहे, जिथे त्याने 7 सामन्यांत तब्बल 28 विकेट्स पटकावल्या होत्या. त्याच्यासह चेतन सकारिया वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. याशिवाय, निवड समितीने वेगवान गोलंदाज नील पांड्या आणि अष्टपैलू अर्थ यादव या दोन युवा खेळाडूंना प्रथमच संघात स्थान देऊन मोठा धक्का दिला आहे.



सौराष्ट्रचा संपूर्ण संघ:


जयदेव उनाडकट (कर्णधार), रवींद्र जडेजा, हार्विक देसाई (यष्टीरक्षक), अर्पित वासवदा, चिराग जानी, प्रेरक मांकड, जय गोहिल, चेतन सकारिया, अंकुर पंवार, सम्मर गज्जर, पार्थ भुत, विश्वराज सिंह जडेजा, हेत्विक कोटक, नील पांड्या, अर्थ यादव आणि तरंग गोहिल.




Comments
Add Comment

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सुरू होणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली: पुरुषांच्या 'हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पंजाब-2026' (Asian Champions Trophy 2026) मधील सामन्यांचे उत्सुकतेने वाट

IND vs WI: वेस्ट इंडिजने भारताला 6 गडी राखून नमवलं, सामना 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गमावला

वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला 6 गडी राखून मात दिली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर

विंडीजला 76 धावांचा फटका, पूरनची चूक पडली महागात! संजू सॅमसनने केलं संधीचं सोनं

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी20 सामना रांचीत सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि

IND vs WI, 2nd T20: नाणेफेकीचा कौल विंडिजच्या बाजूने, भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी, श्रेयस अय्यर म्हणाला...

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे.

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघाने भारताला पाजलं पराभवाचं पाणी, दुसऱ्या सामन्यात 70 धावांनी पराभव, काय चुकलं जाणून घ्या

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना पार पडला आणि

विनोद कांबळीला बघा...तीन वर्षानंतर बोलू...! माजी क्रिकेटपटू कपिल देव वैभव सूर्यवंशीबाबत काय म्हणाले?

वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव.. कमी वयात आणि अल्पावधीतच त्याने नावलौकीक मिळवला. आयपीएल स्पर्धा ते