
मुंबई: चांद्यापासून बांद्यापर्यंत अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची चर्चा सुरू आहे. चित्रपटातील अनेक सीन्सने आणि कथेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. असं असताना प्रेक्षकांचे लक्ष वेधतेय ते विजय साळगांवकरांचं घर. हे तेच घर आहे, ज्याभोवती चित्रपटाचं संपूर्ण कथानक आहे आणि त्या भोवती अनेक रहस्यही दडले आहेत. अनेक चाहत्यांना पडलेला प्रश्न म्हणजे, चित्रपटामध्ये दाखवलेलं विजयचं घर खरोखर आहे का? हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. नेमकं रहस्य काय? जाणून घेऊया...
मुंबई: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी गोव्यातील डोना पाऊलमधील ...
रियल इस्टेट संबंधित असलेला कॉन्टेंट क्रिएटर शिवा भारतने दिलेल्या माहितीनुसार, फिल्ममधील हा प्रसिद्ध बंगला उत्तर गोव्यातील उकासैम या प्रसिद्ध ठिकाणचे आहे. चित्रपटाचा पहिला भाग 31 जुलै 2015 साली रिलीज झाला होता. तेव्हापासून चाहत्यांना चित्रपटातील विजय साळगांवकरांचं घर खरं आहे का? हा प्रश्न पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 100 वर्षे जुना पोर्तुगीज शैलीतील हा बंगला आहे. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान घराच्या आतील सर्व इंटिरियर बदली करण्यात आला असल्याची माहिती आहे. बंगल्यातील सर्व इंटिरियर प्रत्येक चित्रपटाप्रमाणे बदली करण्यात आलेला आहे.
हॉलिवूड मधील चित्रपटांचे बॉलिवूडमध्ये अनेक रिमेक झालेले आहेत. बॉलिवूडमधील काही चित्रपट हे हॉलिवूडच्या चित्रपटांच्या कथांशी निगडित असलेल्या ...
अनेक मिडिया रिपोर्टनुसार, घरातील इंटिरियरची डिझाईन चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे बदली करण्यात आली होती. रियल इस्टेट संबंधित इन्स्टा रीलच्या माहितीनुसार, या घराला अनेक फॅन्स 'दृश्यम मुव्ही हाऊस' म्हणूनच ओळखतात. 'दृश्यम' चित्रपट रिलीजनंतर मोठ्या प्रमाणावर चाहते 'दृश्यम मुव्ही हाऊस'ला भेट देताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणावर चाहते या बंगल्याला भेट देत फोटोज् क्लिक करताना दिसत आहेत. खरंतर, हा बंगला एका 85 वर्षीय वृद्ध महिलेचा असून त्याच ह्या बंगल्याची देखभाल करतात. 'दृश्यम'मधील घरातील सर्व दृश्यांचा वापर उकासैममधील बंगल्याचाच वापर करण्यात आला आहे. तिन्ही पार्टमध्ये विजय साळगावकरच्या बंगल्याने सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे.
मुंबई: बॉलिवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींमध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. ज्येष्ठ ...
दरम्यान, चित्रपटात केवळ विजयचे घरच नाही, तर उकासैममधील एक मेडिकल कॉलेजचा वापर गोवा पोलीस मुख्यालय म्हणून करण्यात आला आहे. याशिवाय, काही दृश्ये पणजीमध्ये चित्रित करण्यात आली आहेत. मुंबईचा वांद्रे- वरळी सी- लिंकदेखील एका फ्रेममध्ये पाहायला मिळत आहे. मुंबईमध्येही चित्रपटातील अनेक सीन्स शुट करण्यात आले आहेत. अंधेरी पश्चिमेतील यशराज फिल्म स्टुडिओमध्ये चित्रपटातील काही सीन्स शुट केले आहेत. पण 'दृश्यम'च्या चाहत्यांसाठी, 'उकासैम'मधील तो जुना बंगला कायमच खास राहणार आहे. कारण, हे तेच घर होते, जिथे विजयचे कुटुंब राहत होते आणि त्याच्या तीन चित्रपटांमधील कथेची अनेक रहस्ये याच घरात दडलेली होती. म्हणून दिग्दर्शकांनी बंगल्याच्या ठिकाणामध्ये कोणताही बदल न करता त्याच ठिकाणाचा वापर केला आहे.





