एक वेळ अशी होती जेव्हा मी...! सारा तेंडुलकरचा फोटो शेअर करत सचिनने दिल्या शुभेच्छा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सारा तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिला आहे. साराबाबत भावना व्यक्त करताना सचिन तेंडुलकर भावुक झाल्याचं स्पष्ट जाणवतं. सचिन तेंडुलकरने सारा तेंडुकरचा अभिमान असल्याचं सांगितलं.

क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी साराचा आज वाढदिवस.. सारा तेंडुलकरने 12 ऑक्टोबर रोजी वयाची 29 वर्षे पूर्ण केली. तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर आला आहे. इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचंही नाव आहे. सचिन तेंडुलकर यांनी आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मनाचा ओला कोपरा उघड केला. साराच्या वाढदिवसानिमित्त वडील या नात्याने सचिन तेंडुलकरने एक भावुक करणारी पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकर यांनी लिहिलं की, एक वेळ अशी होती जेव्हा मी तुला मार्ग दाखवयचो. सचिन तेंडुलकरची ही पोस्ट सोशल मीडियावर लक्षवेधी ठरली आहे. या पोस्टखाली सारा आणि सचिनच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या पोस्टवर लाखो लोकांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय लिहिलं आहे सचिन तेंडुलकरने?


सचिन तेंडुलकरने साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोत सारा तेंडुलकर मराठमोळ्या गेटअपमध्ये दिसत आहे. तर सचिन तेंडुलकरने कुर्ता घातला आहे. हो फोटो पोस्ट करताना सचिन तेंडुलकर कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'एक वेळ अशी होती की मी तुला मार्ग दाखवायतो. आता असं होत नाही. तू कुठे जायचं निवडतेस हे पाहून मला आनंद होतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सारा. लव्ह यू.' सचिनच्या या पोस्टचा अर्थ काही जणांना कळला नाही. तर काही जणांनी आपल्या पद्धतीने या पोस्टचा अर्थ घेतला आहे. सचिनच्या पोस्टचा अर्थ असा की, सचिनला सारा आपल्या जीवनातील सर्वाधिक निर्णय हे स्वत: घेत हे पाहून अभिमान वाटतो.




सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रिय


सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बहुतांश गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे तिने एखादी पोस्ट की चाहते त्याखाली भरभरून प्रतिक्रिया देतात. इंस्टाग्रामवर सारा तेंडुलकरचे 98 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहे. यावरून तिची लोकप्रियता दिसून येते.
Comments
Add Comment

Denmark Open : सिंधूला पहिल्याच फेरीत कठीण प्रतिस्पर्धी! लक्ष्य सेनचंही आव्हान सोपं नाही; कोण मारणार बाजी?

'डेन्मार्क ओपन सुपर 750' बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत असून, भारताच्या प्रमुख खेळाडूंसाठी यंदाचा ड्रॉ अत्यंत

रणजी स्पर्धा खेळण्यात काय अर्थ आहे? दिलीप वेंगसरकर बीसीसीआयवर भडकले, संताप व्यक्त करत म्हणाले...

देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी सर्वात मोठी स्पर्धा आहे. मोठ्या दिमाखात या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. असं

Sunil Gavaskar on Ranji Trophy : रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष? सुनील गावसकर इंडिया A च्या वेळापत्रकावर नाराज

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रणजी ट्रॉफीच्या वेळापत्रकावर आणि

उज्जैनच्या महाकाल मंदिरात क्रिकेटपटूंचा वावर; तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी घेतली भस्म आरतीची अनुभूती

उज्जैन : श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात क्रिकेटपटूंची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. भारताचे युवा फलंदाज

IND vs WI: तिसऱ्या टी20 सामना संपल्यानंतर उर्वरित दोन सामन्याचं श्रेयस अय्यरने गणित मांडलं, म्हणाला..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दोन सामने शिल्लक आहे. भारताने या मालिकेत दोन, तर

जोरदार पुनरागमन! दुसऱ्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला, विंडीजला 14 धावांनी केलं पराभूत

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी20 सामना इंदुरच्या होळकर मैदानात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल