11 लाख ग्राहकांचा विश्वास! TVS Radeon नव्या लूकमध्ये लॉन्च; पाहा फीचर्स आणि किंमत

टीव्हीएस मोटर कंपनीने लोकप्रिय TVS Radeon मोटरसायकलचा नवा अवतार सादर केला आहे. 11 लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास मिळवलेल्या या बाईकमध्ये आकर्षक डिझाइन, आधुनिक LED लाइटिंग आणि आरामदायी प्रवासासाठी उपयुक्त फीचर्स देण्यात आले आहेत.

सणासुदीच्या हंगामाचे औचित्य साधत टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या 'टीव्हीएस रॅडियन' (TVS Radeon) मोटरसायकलची अगदी नवीन आवृत्ती नुकतीच बाजारात सादर केली आहे. आतापर्यंत 11 लाखांहून अधिक ग्राहकांनी या दुचाकीवर आपला विश्वास दाखवला असून, कंपनीने या नव्या मॉडेलमध्ये आधुनिक डिझाइन आणि आकर्षक लूकची जोड दिली आहे.



आकर्षक डिझाइन आणि अत्याधुनिक एलईडी लाइटिंग


नव्या टीव्हीएस रॅडियनच्या बाह्यरूपात मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये फ्युएल टँक, साइड पॅनल आणि रिअर काउलची रचना अधिक देखणी करण्यात आली असून, नवीन डायनॅमिक ग्राफिक्समुळे या मोटरसायकलला अधिक तरुण आणि गतिमान रूप मिळाले आहे. दुचाकीच्या पुढील बाजूस सिग्नेचर लाइटिंगसह अगदी नवीन फुल एलईडी हेडलॅम्प देण्यात आला आहे. त्याला साजेसे एलईडी टर्न सिग्नल लॅम्प्स आणि मागील बाजूस 3D टनेल इफेक्ट असलेला आकर्षक एलईडी टेल लॅम्प यामुळे या बाईकचा अंदाज पूर्णपणे बदलला आहे.



आरामदायी प्रवास आणि आधुनिक फीचर्स


डिझाइनमधील बदलांसोबतच प्रवाशांच्या आरामाची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या मोटरसायकलमध्ये तिच्या श्रेणीतील सर्वात लांब सीट (Long Seat) देण्यात आली आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवासात चालकाला आणि सहप्रवाशाला अधिक आराम मिळतो. तसेच, RTMi सुविधेसह (Real-Time Mileage Indicator) रिव्हर्स एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जोडण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यान आवश्यक ती सर्व माहिती चालकाला सहज उपलब्ध होईल.



कंपनीची भूमिका आणि उपलब्धता


या नवीन लॉन्चिंगबाबत बोलताना टीव्हीएस मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध हलदार यांनी स्पष्ट केले की, "ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैली आणि अपेक्षेनुसार ही नवीन रॅडियन विकसित करण्यात आली आहे. बाईकची उत्कृष्ट बांधणी, विश्वासार्हता आणि दैनंदिन वापरातील उपयुक्तता कायम राखत तिला अधिक मॉडर्न लूक देण्यात आला आहे."


नवीन टीव्हीएस रॅडियन कंपनीच्या अधिकृत डीलरशिप्सवर तीन वेगवेगळ्या प्रकारांत (Variants) उपलब्ध करून देण्यात आली असून, तिची प्रारंभिक किंमत 67,100 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

Comments
Add Comment

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा; हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद!

नवी दिल्ली: हॉकी इंडियाने 'आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पंजाब 2026' साठी भारतीय पुरुष हॉकी संघाची अधिकृत घोषणा केली आहे.

IPL 2027 स्पर्धेत रोहित शर्माकडे पुन्हा येणार कर्णधारपदाची धुरा? असं कसं होऊ शकते? ते समजून घ्या

[caption id="attachment_1066176" align="aligncenter" width="800"] आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांची आढावा बैठक, प्रत्येक बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्याचे दिले आदेश

नाशिक: नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासह गोदावरी आरती व विविध शासकीय

Share Market News: इन्वेस्टर्ससाठी आनंदाची बातमी, सेन्सेक्स तब्बल 1109 अंकांनी वधारला; आयटी शेअर्सची तुफान फटकेबाजी

मुंबई: भारतीय शेअर बाजारात मंगळवारी अभूतपूर्व तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1109.10 अंकांनी

IPL 2027: सौरव गांगुलीचा मास्टरस्ट्रोक; दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला भारताचा सर्वात मोठा चॅम्पियन!

टी20 क्रिकेटमध्ये एक काळ गाजवलेला आणि अभिषेक शर्मा-प्रभसिमरन सिंगसारख्या खेळाडूंना घडवणाऱ्या युवराज सिंगकडे

अबब...! 1.23 लाखांची 10 रुपयांची नाणी देत खरेदी केली दुचाकी; तीन वर्षे नाणी जमा करून स्वप्न केलं साकार

तेलंगणा: तेलंगणातल्या मंचिर्याल जिल्ह्यातील लक्सेट्टिपेटमधील 51 वर्षीय बी. रवी जोसेफ यांनी पैसे साठवून आपलं