Tuesday, October 13, 2026

Nana Patekar : ‘आठवणीतले नाना’ कार्यक्रमातून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा

बुधवारी, 14 ऑक्टोबर 2026 रोजी हा कार्यक्रम पार पडणार असून, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या कलाप्रवासाची आठवण जागवण्यासाठी मुंबईत ‘आठवणीतले नाना’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने हा आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी, 14 ऑक्टोबर 2026 रोजी हा कार्यक्रम पार पडणार असून, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कलाप्रवासाचे स्मरण करणे आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाला अभिवादन करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाची आणि कारकिर्दीची आठवण ताजी केली जाणार आहे.

या आदरांजली सभेनंतर दादासाहेब फाळके रसास्वाद मंडळाच्या उपक्रमांतर्गत नाना पाटेकर अभिनीत चित्रपटाचे प्रदर्शनही करण्यात येणार आहे. त्यामुळे उपस्थितांना त्यांच्या अभिनयाचा पुन्हा एकदा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

हा कार्यक्रम 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील लघु नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचा तपशील

कार्यक्रमाचे नाव : ‘आठवणीतले नाना’

दिनांक : 14 ऑक्टोबर 2026, बुधवार

वेळ : सायंकाळी 5.30 वाजता

स्थळ : लघु नाट्यगृह, तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई.

टॅग्स : नाना पाटेकर, आठवणीतले नाना, आशिष शेलार, मराठी चित्रपटसृष्टी, सांस्कृतिक कार्यक्रम, मुंबई बातम्या, महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >