
इंडियन प्रीमिअर लीग (IPL) सुरू होण्यापूर्वीच संघ बांधणीसाठी जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील ताज्या खेळाडूंच्या अदलाबदलीच्या (Player Trade) घोषणेने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. या ट्रेड विंडो अंतर्गत, घातक यॉर्करसाठी प्रसिद्ध असलेला वेगवान गोलंदाज टी. नटराजन पुन्हा एकदा आपल्या जुन्या संघात म्हणजेच सनरायझर्स हैदराबादमध्ये (SRH) परतला आहे, तर युवा लेग-स्पिनर झीशान अन्सारी दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) संघात सामील झाला आहे.
सनरायझर्स हैदराबादमध्ये नटराजनचे पुनरागमन
टी. नटराजन हा सनरायझर्स हैदराबादच्या सर्वात यशस्वी आणि भरवशाच्या गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. त्याने आयपीएल २०२४ च्या हंगामात अप्रतिम गोलंदाजी करताना तब्बल 19 बळी टिपले होते. तो त्या हंगामात हैदराबादकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता आणि संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. फ्रँचायझीने त्याला आता 5 कोटी रुपयांच्या सुधारित शुल्कावर करारबद्ध केले आहे. नटराजनच्या पुनरागमनामुळे हैदराबादची गोलंदाजीची बाजू अधिक मजबूत झाली आहे. आतापर्यंत त्याने एकूण 73 आयपीएल सामन्यांमध्ये 72 बळी घेतले असून, 19 धावांत 4 बळी ही त्याची लीग मधील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने भारतासाठी 1 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सकडून फिरकी विभागाला बळकटी
दुसऱ्या बाजूला, युवा लेग-स्पिनर झीशान अन्सारी आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. तो त्याच्या सध्याच्या 40 लाख रुपयांच्या शुल्कावर दिल्ली संघात सामील झाला आहे. अन्सारीने मागील हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून 10 सामने खेळले होते. विशेष म्हणजे, त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पदार्पण सामन्यातच 3 बळी घेत आपल्या आयपीएल कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली होती. आतापर्यंत त्याने 10 आयपीएल सामन्यांमध्ये 6 बळी घेतले आहेत. दिल्ली कॅपिटल्सला आशा आहे की, या तरुण फिरकीपटूच्या आगमनामुळे त्यांचा फिरकी गोलंदाजी विभाग अधिक धारदार होईल.
भारत आणि वेस्ट इंडिज चौथ्या टी20 सामन्यासाठी आमनेसामने आले आहे. खरं तर या सामन्यात वेस्ट इंडिजची करो या मरोची स्थिती आहे. कारण हा सामना गमावला तर मालिका ...
दिल्ली कॅपिटल्स संघाला दोन मोठे महत्त्वाचे फायदे
1. पर्स व्हॅल्यूमध्ये (Purse Money) मोठी वाढ: दिल्ली कॅपिटल्सने टी. नटराजनला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. या ट्रेडनंतर नटराजन हैदराबादमध्ये गेल्यामुळे आणि त्याच्या बदल्यात फक्त 40 लाख रुपयांचा झीशान अन्सारी संघात आल्यामुळे, दिल्लीच्या पर्समध्ये तब्बल 10.35 कोटी रुपयांची बचत झाली आहे. आगामी आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनमध्ये (Mini Auction) नवीन आणि दर्जेदार खेळाडूंना खरेदी करण्यासाठी दिल्लीला या पैशांचा मोठा फायदा होईल.
2. फिरकी गोलंदाजीला (Spin Department) मजबुती: दिल्लीने यापूर्वीच त्यांचा स्टार स्पिनर कुलदीप यादवला लखनऊ सुपर जायंट्ससोबत (LSG) ट्रेड केले आहे. त्यामुळे संघात एका चांगल्या फिरकीपटूची जागा रिकामी होती. 26 वर्षीय लेग-स्पिनर झीशान अन्सारी हा घरगुती क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याने आयपीएलमध्ये पदार्पण करताना दिल्लीविरुद्धच 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या येण्याने दिल्लीच्या फिरकी आक्रमणाला नवा पर्याय आणि खोली (Depth) मिळाली आहे.
शिवाय, नटराजन मागील दोन हंगामात दुखापतींमुळे सर्व सामने खेळू शकला नव्हता आणि 2026 च्या हंगामात 10 सामन्यांत 11.18 च्या महागड्या इकॉनॉमीने त्याने फक्त 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे दिल्लीने एका महागड्या गोलंदाजाला सोडत हुशारीने मोठी रक्कम वाचवली आहे.




