'डीपीडीसी'चा निधी यापुढे दुष्काळी उपाययोजनांसाठीच! - पाणीटंचाईवरील उपाययोजनांना प्राधान्य

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीचा (डीपीडीसी) निधी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी वापरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निधीतून जलसंधारण, शेतरस्ते, पाणीटंचाई निवारण आणि चारा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच पाणीपुरवठा योजनांना पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यप्रणाली तयार करणे, चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि पाण्याच्या टँकरवर जीपीएस यंत्रणा बंधनकारक करण्याचे निर्णयही घेण्यात आले आहेत.


महसूलमंत्री तथा दुष्काळी उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. वीजबिलांच्या थकबाकीमुळे बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ऊर्जा आणि पाणीपुरवठा विभागांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना एकत्रित कार्यप्रणाली तयार करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील बंद पाणीपुरवठा योजनांबाबत उपाययोजना करणे शक्य होईल.



दुष्काळी भागांत जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे. तलावांच्या परिसरात, जलसंधारणाच्या साठ्यांजवळ चारा लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार असून, शेतकऱ्यांनी चारा पिकविल्यास तो खरेदी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले जाणार असून, कृषी विभाग कार्यकारी यंत्रणा आणि पशुसंवर्धन विभाग प्रशासकीय विभाग म्हणून काम पाहणार आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे हा शेवटचा पर्याय असेल. त्याआधी गावातील विहिरींचे अधिग्रहण आणि अन्य आवश्यक उपाययोजना केल्या जातील. टँकरची आवश्यकता भासल्यास प्रत्येक टँकरच्या हालचालींवर जीपीएसद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.


दरम्यान, डीपीडीसीच्या निधीतून यापुढे सिमेंट रस्त्यांची कामे केली जाणार नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नगरपालिका, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद क्षेत्रात पालकमंत्र्यांना या निधीतून सिमेंट रस्त्यांची कामे मंजूर करता येणार नाहीत. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध निधी जलसंधारण, शेतरस्ते, पाणीटंचाई निवारण आणि चारा उपलब्धतेसाठी वळविण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज - मंत्री अदिती तटकरे

मुंबई : राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच

Pusad Accident : पुसद-दिग्रस मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन स्कुटीवरील दोघांचा मृत्यू

पुसद : पुसद-दिग्रस मार्गावरील पुस नदीच्या नवीन पुलावर ट्रक आणि स्कुटीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कुटीवरून

BMC Toilet Charges : आता लघुशंकेसाठीही पैसा मोजा, सार्वजनिक शौचालयाच्या विद्यमान शुल्कांत होणार वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पे अँड युज असलेल्या सार्वजनिक शौचालयांची सेवा लवकरच महाग होणार आहे. मुंबई

Maharashtra weather : महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, उकाडाही कायम

मुंबई : राज्यात मान्सूनचा हंगाम संपल्यानंतर उन्हाचा चटका वाढला असून, ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांना उकाड्याचा

सोमेश्वर कारखान्यावर विजय मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "विजय म्हणजे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ"

पुणे: सोमेश्वर कारखान्यावर मिळवलेला हा विजय म्हणजे दादांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ आहे अशा शब्दात आपल्या

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांची आढावा बैठक, प्रत्येक बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्याचे दिले आदेश

नाशिक: नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासह गोदावरी आरती व विविध शासकीय