Wednesday, October 14, 2026

ठाणे जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार, स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे अण्णा बनसोडे यांचे निर्देश...

ठाणे जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित जमिनीवर त्यांचे स्मारक विकसित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने महिला- बालविकास विभागाकडे जमीन मागणीचा सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जांभूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित जमिनीवर त्यांचे स्मारक विकसित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने महिला- बालविकास विभागाकडे जमीन मागणीचा सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर महसूल विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही विधानसभा उपाध्यक्ष यांनी दिले.

जांभूळ येथील संबंधित सुमारे 50 एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी ठाण्यातील डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानने केली आहे. त्याअनुषंगाने विधानभवनामध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे आणि विशेष सहाय्य विभाग सचिव हर्षदीप कांबळे, जलसंपदा विभागाचे सचिव प्र. बा. मिसाळ, समाज कल्याण (मुंबई विभाग) प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, ठाण्याचे सहायक आयुक्त समाधान इंगळे, कल्याण उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी वृषाली पाटील, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर, महसूल विभागाचे कक्ष अधिकारी डॉ. सुनील निमगावकर, म्हारळच्या मंडळ अधिकारी प्रीती घुडे, जांभूळ येथील शासकीय पुरुष भिक्षेकरीगृहचे प्रभारी अधीक्षक योगेश येंदे, डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहूल हंडोरे, सचिव कुसुम गौतम यांच्यासह महिला व बालविकास तसेच सामाजिक न्याय विभाग आणि अन्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

"> " class="section-post-content-internal-post-title">Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल राज्य मंत्रिमंडळाकडून अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी मांडला प्रस्ताव

महाराष्ट्रातील १२ लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांसह विविध योजनांचा गौरव मुंबई : घटनात्मक पदावर राहून सलग २५ वर्षे जनसेवा केल्याबद्दल पंतप्रधान ...

सध्या ही जमीन महिला- बालविकास विभागाच्या ताब्यात असून, तिचा स्मारकासाठी उपयोग करण्याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी उपाध्यक्षांनी दिले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 साली जांभूळ येथे जमीन खरेदी केली होती. निवडणूक लढविण्यासाठी जमीनधारणा आवश्यक असल्याच्या तत्कालीन तरतुदींच्या पार्श्वभूमीवर ही जमीन खरेदी करण्यात आली होती. पुढे ही जमीन विकण्यात आली. मात्र, 1936 ते 1942 या कालावधीत बाबासाहेबांचे या परिसराशी वास्तव्याच्या माध्यमातून नाते जोडले गेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणांचा विकास करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर, जांभूळ येथील जमिनीवर बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी प्रतिष्ठानने यावेळी केली.

"> " class="section-post-content-internal-post-title">Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल राज्य मंत्रिमंडळाकडून अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी मांडला प्रस्ताव

महाराष्ट्रातील १२ लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांसह विविध योजनांचा गौरव मुंबई : घटनात्मक पदावर राहून सलग २५ वर्षे जनसेवा केल्याबद्दल पंतप्रधान ...

बैठकीत सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास विभाग, महसूल विभाग तसेच ठाणे जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वयातून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश अण्णा बनसोडे यांनी दिले. ते म्हणाले, जांभूळ येथील या जमिनीचा प्रश्न प्रशासकीय समन्वयातून मार्गी लागल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय विभागाने प्रथम जमीन मागणीचा प्रस्ताव महिला- बालविकास विभागाकडे सादर करावा आणि त्यानंतर महसूल विभागाशी समन्वय साधून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी, असे उपाध्यक्ष बनसोडे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >