BMC Toilet Charges : आता लघुशंकेसाठीही पैसा मोजा, सार्वजनिक शौचालयाच्या विद्यमान शुल्कांत होणार वाढ

निशुल्क असलेल्या लघुशंकेसाठी १ रुपया तर शौचासाठी ५ रुपये आकारले जाणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील पे अँड युज असलेल्या सार्वजनिक शौचालयांची सेवा लवकरच महाग होणार आहे. मुंबई महापालिकेने सध्या मोफत असलेल्या मुतारीसाठी १ रुपया शुल्क लावण्याचा आणि इतर सुविधांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव करण्यात आला असून लवकरच हा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे मांडला जाणार आहे. यामध्ये शौचालयाचे शुल्क २ वरून ५ रुपये आणि स्नानगृहाचे शुल्क ५ वरून १० रुपये केला जाणार आहे.


मुंबईत ८४६ "पे-अँड-यूज" सार्वजनिक शौचालय असून या शौचालयांच्या चालकांनी देखभालीच्या खर्चाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर ही दरवाढ महापालिकेने प्रस्तावित केली आहे. सार्वजनिक शौचालयांची उभारणी महापालिकेच्यावतीने करण्यात आली असली तरी याचे व्यवस्थापन खासगी संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांच्याकडे आहे.






सध्या मुतारीचा वापर निशुल्क तथा मोफत आहे, तर शौचालयासाठी २ रुपये आणि स्नानगृहासाठी ५ रुपये लागतात. तर प्रस्तावित बदलानुसार तिन्ही दर वाढतील आणि मुतारी ही प्रथमच सशुल्क होईल. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शौचालयांची स्वच्छता आणि निगा खासगी संस्थामार्फत राखली जाते. त्यावरील व्यवस्थापन खर्च वाढत आहे. चालकांना वाढता देखभाल खर्च पेलता यावा, याकरता त्यांच्या मागणीनुसार ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आला आहे.


ही वाढ फक्त सार्वजनिक पे-अँड-यूज शौचालयांना लागू होईल, तर सामुदायिक शौचालयांचे शुल्क कदाचित तसेच राहील. मुंबईत सुमारे ८,१७३ सामुदायिक शौचालय आहेत, त्यापैकी ३,११०ची देखभाल महापालिका करते.


मुंबईत कामाधंद्यासाठी घराबाहेर पडलेल्या आणि बदलत्या जीवन शैलीमुळे मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना लघुशंकेसाठी वारंवार जावे लागते. त्यामुळे घराबाहेर असलेल्या नागरिकांना सार्वजनिक शौचालयांचा आधार असतो. परंतु, आता ज्या सार्वजनिक शौचालयांमध्ये मुतारीकरता एकही पैसा मोजावा लागत नव्हता, तिथे आता एक रुपया मोजावा लागणार आहे. मुंबईत आजवर अनेकदा सार्वजनिक शौचालयांचे शुल्क वाढवण्याचा प्रयत्न झाला, परंतु प्रत्येक वेळी मुतारीची सेवा निशुल्क तथा मोफतच देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे मुतारीकरता प्रस्तावित १ रुपयांचे प्रशासनाला मागे घ्यावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आह.

Comments
Add Comment

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

'पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका!' पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा नागरिकांना संदेश

मुंबई : पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचा