रियाधवरील हल्ल्याचे भीषण पडसाद! इंडिगो-अकासासह अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर 17 ऑक्टोबरपर्यंत टांगती तलवार

रियाध विमानतळावरील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव IndiGo आणि Akasa Air यांनी सौदी अरेबियासाठीच्या अनेक विमानसेवा 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत स्थगित केल्या आहेत.

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील हवाई वाहतूक पूर्णपणे ढवळून निघाली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतातील प्रमुख विमान कंपन्या असलेल्या इंडिगो (Indigo) आणि अकासा एअर (Akasa Air) यांनी आपल्या विमानसेवेवरील निर्बंध 17 ऑक्टोबरपर्यंत वाढवल्याची घोषणा केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून, दोन्ही कंपन्यांनी स्वतंत्र प्रवासविषयक सूचना (Travel Advisory) जारी केल्या आहेत.



इंडिगो आणि अकासा एअरचे मोठे पाऊल


मंगळवारी इंडिगो एअरलाइनने जारी केलेल्या निवेदनानुसार, सौदी अरेबियातील बिघडलेली परिस्थिती पाहता रियाध, जेद्दाह, दम्माम आणि मदिना येथे येणारी व तेथून जाणारी सर्व विमान उड्डाणे 17 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. कंपनीने प्रवाशांना विमानतळावर निघण्यापूर्वी आपल्या विमानाची सद्यस्थिती ऑनलाइन तपासण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मदतीसाठी कंपनीची सहाय्यता पथके (Support Teams) तैनात करण्यात आली आहेत. दुसरीकडे, अकासा एअरनेही 13 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या सूचनेत रियाध आणि जेद्दाहसाठीची उड्डाणे17 ऑक्टोबरपर्यंत स्थगित ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे ज्या प्रवाशांचे बेताचे नियोजन कोलमडले आहे, त्यांना संपूर्ण तिकीट परतावा (Full Refund) देण्याची घोषणा अकासाने केली असून, ही रक्कम 7 दिवसांच्या आत प्रवाशांच्या मूळ खात्यात जमा केली जाईल. याशिवाय प्रवाशांना आपल्या प्रवासाचे वेळापत्रक नव्याने निश्चित (Reschedule) करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.



इतर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची उड्डाणेही रद्द


सौदी अरेबियासाठी विमानसेवा स्थगित करणाऱ्यांमध्ये केवळ भारतीय कंपन्यांचाच समावेश नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक कंपन्यांनी आपली उड्डाणे रोखली आहेत. यामध्ये एअर इंडिया, फ्लाय दुबई, लुफ्थांसा समूह आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स यांनीही सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या विमानसेवा काही काळासाठी रद्द केल्या आहेत.



रियाधवरील क्षेपणास्त्र हल्ला आणि भारताची भूमिका


रविवारी रियाधच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेला हा क्षेपणास्त्र हल्ला सौदी अरेबियावरील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे. हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 11 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. "सामान्य नागरिक आणि त्यांच्या वापरातील सार्वजनिक ठिकाणांना वारंवार लक्ष्य करणे अजिबात सहन केले जाऊ शकत नाही, असे हल्ले तातडीने थांबले पाहिजेत," अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली आहे. सौदी अरेबियातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीवर भारत सरकारचे बारीक लक्ष असून, विमानसेवा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे.

Comments
Add Comment

अबब...! 1.23 लाखांची 10 रुपयांची नाणी देत खरेदी केली दुचाकी; तीन वर्षे नाणी जमा करून स्वप्न केलं साकार

तेलंगणा: तेलंगणातल्या मंचिर्याल जिल्ह्यातील लक्सेट्टिपेटमधील 51 वर्षीय बी. रवी जोसेफ यांनी पैसे साठवून आपलं

महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू!

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज (१३ ऑक्टोबर) पणजी येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

भारताचा दणका! लदाखमधील 28 ठिकाणांच्या नामांतरामुळे चीनची लाहीलाही; भारताने सुनावले खडेबोल

नवी दिल्ली : लदाखमधील 28 महत्त्वाच्या भौगोलिक आणि सामरिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांना अधिकृत व प्रमाणित नावे

UPI MDR Charge Update : UPI युजर्ससाठी मोठी बातमी; मर्चेंट पेमेंटवर MDR लागू करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर, लवकरच जाहीर होणार नवी तारीख

नवी दिल्ली : सध्या सणासुदीचा काळ सुरू असताना, यूपीआय (UPI) द्वारे डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी आणि

PM Modi Bloomberg Speech : सत्तेचा खरा अर्थ काय ? पंतप्रधान मोदींनी ब्लूमबर्ग फोरममध्ये मांडले स्पष्ट विचार!

नवी दिल्ली : "सत्ता कोणाकडे आहे किंवा ती कोणाजवळ एकवटली आहे, यापेक्षा त्या सत्तेचा वापर सर्वसामान्य जनतेच्या

राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल! आंदोलकाला कोपर मारल्याचा आरोप

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला