
मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत शिवसेनेने यंदाचा आपला ऐतिहासिक दसरा मेळावा पूर्णपणे दुष्काळग्रस्तांना समर्पित केला आहे. पक्षाकडून नुकताच या मेळाव्याचा विशेष टीझर रिलीज करण्यात आला आहे. 'शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,' अशी ठाम ग्वाही देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करण्याचे आवाहन केले आहे. आगामी मंगळवारी, 20 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को संकुलात हा सोहळा पार पडणार आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभी शिवसेना
गेल्या वर्षीही अतिवृष्टी आणि पूर संकटाच्या काळात शिवसेनेने पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दसऱ्याचे तोरण लावले होते आणि मदतीचा हात पुढे केला होता. यंदाही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह राज्यभरातील शिवसैनिक प्रत्यक्ष बांधावर जाऊन बळीराजाला धीर देत आहेत. राज्यावरील संकट पाहता यंदाचा दसरा मेळावा हा केवळ राजकीय उत्सव न राहता सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा एक मोठा संकल्प सोहळा बनला आहे.
मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डिजिटल सेवा वितरणावर ...
मदतीचा ओघ सुरू आणि राज्यस्तरीय कार्यक्रमाची घोषणा
संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाकडून शेतकऱ्यांच्या मुलांना 25 हजार सायकलींचे वाटप केले जात असून, महिलांसाठी 25 हजार शिलाई मशीनचे वितरण सुरू आहे. तसेच, दसऱ्यापूर्वीच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी अन्नधान्य आणि आनंदाचा शिधा पोहोचवला जात आहे. आगामी दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुष्काळग्रस्तांच्या मदतीबाबत सविस्तर भूमिका मांडणार असून, शिवसैनिकांसाठी एक सर्वसमावेशक राज्यस्तरीय मदत कार्यक्रम घोषित करण्याची शक्यता आहे.





