Thursday, October 15, 2026

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच १५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच १५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. गुरुवारी रायगडमधील काही निवडक भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारीही उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून, दुपारच्या किंवा संध्याकाळच्या सुमारास हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. गुरुवारी काही निवडक भागांत उष्णतेची लाट येऊ शकते, यामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या जिल्ह्यात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवार आणि रविवारी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाण्यात उष्ण आणि दमट हवामानासह पावसाची शक्यता

मुंबई आणि ठाण्यामध्ये गुरुवार आणि शुक्रवारी काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबईत शनिवार आणि रविवारी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाण्यात शनिवारी हलका ते माध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस, रविवारी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस आणि १९ ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये गुरुवारी काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज असून त्यानंतर शुक्रवार ते रविवार पर्यंत हवामान कोरडे राहील. १९ ऑक्टोबर रोजी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान

भारतीय हवामान विभागाने १५ ते १९ ऑक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. नाशिकमध्ये देखील गुरुवार ते रविवारपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून १९ ऑक्टोबर रोजी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. शनिवारी हलका पाऊस आणि त्यानंतर १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

पश्चिम महाराष्ट्राची स्थिती काय?

पुणे जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच तशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. पुण्याच्या घाटात गुरुवारी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा तर शुक्रवारी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये संपूर्ण पाच दिवसांच्या कालावधीत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी तशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. साताऱ्यात गुरुवारी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >