Kolhapur Crime : शातीर पुतण्याचा भयानक कारनामा! चुलत्याच्या सोन्यावर डल्ला मारून घेतली 10 लाखांची थार; पूजेला बोलावले अन्...

विशेष म्हणजे, नवीन कारच्या पूजेसाठी त्याने ज्या चुलत्याच्या घरातून दागिने चोरी केल्याचा आरोप आहे, त्यांनाच कुटुंबासह आमंत्रित केले.

Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 19 वर्षीय पुतण्याने चुलत्याच्या घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. या दागिन्यांची विक्री करून मिळालेल्या पैशांतून त्याने तब्बल 10 लाख रुपयांची महिंद्रा थार कार खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, नवीन कारच्या पूजेसाठी त्याने ज्या चुलत्याच्या घरातून दागिने चोरी केल्याचा आरोप आहे, त्यांनाच कुटुंबासह आमंत्रित केले. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी तरुणासह चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनाराला ताब्यात घेतले आहे.




महिनाभरापूर्वी दागिन्यांची चोरी


मिळालेल्या माहितीनुसार, समर पोपट चव्हाण हा सातवे येथे कुटुंबासह राहतो. त्याचे चुलते उमेश मारुती चव्हाण यांचे घर जवळच आहे. सुमारे महिनाभरापूर्वी समरने चुलत्याच्या घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे दागिने गावातील सोनार संग्राम बाबासो मोरे याला 10 लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.


या पैशांतून समरने महिंद्रा थार कार खरेदी केली. नवीन कार घरी आणल्यानंतर त्याने पूजेसाठी चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रित केले.



दागिने शोधताना चोरीचा प्रकार उघड


कारच्या पूजेसाठी तयार होत असताना उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दागिने शोधले. मात्र, दागिने ठेवलेल्या ठिकाणी ते आढळले नाहीत. विशेष म्हणजे, घरातील आजीचे दागिने जागेवर होते; मात्र उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचे दागिने गायब होते. त्यामुळे चोरी घरातील किंवा जवळच्या व्यक्तीने केली असावी, असा संशय त्यांना आला.


यानंतर उमेश चव्हाण यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. समरने अचानक महागडी कार कशी खरेदी केली, याची चौकशी केल्यानंतर चोरीच्या प्रकरणात त्याचा सहभाग उघड झाल्याची माहिती आहे.



पुतण्या आणि सोनार पोलिसांच्या ताब्यात


या प्रकरणी पोलिसांनी समर चव्हाण आणि चोरीचे दागिने खरेदी केल्याचा आरोप असलेल्या संग्राम मोरे यांना ताब्यात घेतले आहे. चोरीचे दागिने आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास कोडोली पोलीस करत आहेत. पोलीस उपअधीक्षक श्रीकांत ठिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे वृत्त आहे.


Comments
Add Comment

Asian Para Games 2026 : भारताची सुवर्ण झेप; हॅनेयचा विश्वविक्रम आणि भारताची ऐतिहासिक 'सेंचुरी' पूर्ण!

ऐची-नागोया : जपानमध्ये सुरू असलेल्या २०२६ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये (Asian Para Games 2026) भारतीय खेळाडूंनी तुफान कामगिरी

Uttar Pradesh : महोबा जिल्हा रुग्णालयात बैलांची एन्ट्री ! इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांची धावपळ; घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात

India china border dispute : अरुणाचल सीमेवर भारत-चीन गतिरोध कायम, आयटीबीपी प्रमुखांचा मोठा खुलासा!

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमेवर अद्यापही तणावाचे वातावरण कायम असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

Bunty Dixit Murder : 'दोस्त की दुश्मन?' आधी कारने उडवले, मग रॉडने ठेचून हत्या; छत्रपती संभाजीनगरमधील भयानक हत्याकांड

Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन-7 परिसरात गुरुवारी दिवसाढवळ्या एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली.

Delhi-NCR Air Pollution : दिल्ली-NCR मधील प्रदूषण रोखण्यासाठी CAQM अ‍ॅक्शन मोडमध्ये ! पंजाब-हरियाणाला पराली जाळण्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश

Delhi-NCR Air Pollution : हिवाळ्यात दिल्ली-NCR परिसरातील वायुप्रदूषणात होणारी वाढ रोखण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने

Cancer Medicine Price: कॅन्सरची औषधे स्वस्त होणार ? केंद्र सरकारचा 30% ट्रेड मार्जिनचा प्रस्ताव

Cancer Medicine Price Reduction : कर्करोगावरील उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या