Tuesday, October 27, 2026

Mumbai Nashik highway fire : मुंबई-नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग; कापडाच्या गोण्यांमुळे आगीने घेतला उग्र अवतार

मंगळवारी शहापूर जवळील चेर्पोली परिसरात एका धावत्या ट्रकला अचानक भयानक आग लागली. या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही वेळ प्रवाशांमध्ये घबराट उडाली आणि एकच तारांबळ उडाली.

मुंबई-नाशिक (Mumbai-Nashik Expressway) महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी शहापूर जवळील चेर्पोली परिसरात एका धावत्या ट्रकला अचानक भयानक आग लागली. या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही वेळ प्रवाशांमध्ये घबराट उडाली आणि एकच तारांबळ उडाली.

कशी घडली नेमकी घटना ?

मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जात होता. प्रवासात असताना शहापूरमधील चेर्पोली येथे अचानक या वाहनाला आगीने आपल्या विळख्यात घेतले. विशेष म्हणजे, या ट्रकमध्ये कापडाचे टाकाऊ तुकडे आणि अवशेष मोठ्या प्रमाणात भरलेले होते. कापड ज्वलनशील असल्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली आणि काही मिनिटांतच संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, त्यात ट्रक पूर्णपणे जळताना आणि आकाशात काळ्या धुराचे मोठे लोट उडताना स्पष्ट दिसत आहेत. या आगीत ट्रकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अग्निशामक दलाची कारवाई आणि जीवितहानीबाबत माहिती

ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, या आगीत कोणी जखमी झाले आहे किंवा कोणती जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, ट्रकला अचानक आग नक्की कशामुळे लागली, याचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. या भीषण आगीमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा ताळमेळ काही काळ बिघडला होता, परंतु अग्निशामक दलाच्या आणि प्रशासनाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >