
दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाईदुबाई विमान FZ1073 मधील एक धक्कादायक प्रकार 30 सप्टेंबरला समोर आला होता. या विमानात को पायलटने कॅप्टन स्मित मछार याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. तेल अवीवला जाणारं विमान पाडण्याच्या दृष्टीने को पायलटने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात कॅप्टन स्मित पूर्णपणे जखमी झाले, पण त्यांनी विमान क्रॅश करण्यापासून वाचवलं. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्याने हिमतीने लढा दिला. त्याच्या हिमतीमुळे विमानातील सर्व प्रवाशांचे जीव वाचले होते. या हल्ल्यात कॅप्टन स्मित गंभीर जखमी झाले होते. इतकंच काय तर जखमा इतक्या गंभीर होता की डोक्याच्या कवटीला तडा गेला होता. त्यामुळे त्यांचं वाचणं कठीण होतं. आता कॅप्टन स्मितच्या डोक्यावरील शस्त्रक्रियेच्या मोठ्या खुणा आणि टाके दाखवणारा एक फोटो समोर आला आहे. डोक्यावरील व्रण पाहून नेमकं काय झालं असेल याचा अंदाज येतो. इतकंच या सर्जरीचं डॉक्टरांनी केलेलं वर्णन ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कॅप्टन स्मितने एकदा नाही तर दोनदा मृत्यूला चकवा दिल्याचं तुम्हाला मान्य करावं लागेल.
काय म्हणाले डॉक्टर?
संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद नाह्यान यांनी 27 ऑक्टोबरला अबू धाबी येथे कॅप्टन स्मित यांचा सन्मान केला. कॅप्टन स्मित आणि त्याच्या क्रूला फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेद II हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी स्मित यांच्या डोक्याच्या जखमा दाखवणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अमेरिकन न्यूरोसर्जन डॉ. सनत दीक्षित यांनी सांगितलं की, स्मितला डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कवटीला तडा गेल्याचा धोका नव्हता, तर मेंदूच्या प्रमुख रक्तवाहिनीला इजा होण्याची भीती होती. कारण हीच रक्तवाहिनी मेंदूतून रक्त बाहेर वाहून नेते. जर तिला इजा झाली तर गंभीर रक्तस्राव झाला असता. गंभीर दुखापतींमध्ये मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोका 40 टक्क्यांपेक्षा जास्त असतो.
😢🫡🤍 https://t.co/ZhxsXEZeoA
— Ranvir Shorey (@RanvirShorey) October 28, 2026
Heartiest congratulations to Captain Smit Machchhar 🇮🇳 The Indian pilot who, despite being attacked with an axe and seriously injured mid-air, still found the strength to open the cockpit door — allowing crew and passengers to stop a potential disaster and safely land the plane. UAE has now honoured him with the prestigious Order of Zayed II (First Class). True courage. Calm under pressure. An inspiration to every Indian. Salute, Captain. 🙏🏻
— Jigar B Desai (@JigarBDesaii) October 28, 2026
नवी दिल्ली: ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण, सुशासन आणि विकास नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र शासनाने एक अत्यंत ...
डॉ. दीक्षित पुढे म्हणाले की, शस्त्रक्रियेदरम्यान कवटीचा तुटलेला तुकडा काढणं कठीण आणि अत्यंत धोक्याचं होतं. हा तुकडा रक्तवाहिनीवर दाब देऊन रक्तस्राव थांबवू शकत होता. त्यामुळे हा तुकडा काढताना रक्तवाहिनीला इजा होऊ शकली असती. त्यातून तीव्र रक्तस्राव होऊ शकला असता. एक मिनिटात एक लिटरपर्यंत रक्त वाहून जाण्याचा धोका होता. त्यामुळे डॉक्टर स्मित यांना झालेली दुखापत किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. इतकंच छात्राचित्रात दिसत असलेल्या व्रणांवरून एक बाब स्पष्ट आहे की त्यावर किमान दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या असाव्यात. एक कवटीचा भाग काढण्यासाठी आणि दुसरा ते पुन्हा जोडण्यासाठी.. सौदी अरेबियात विमान उतरल्यानंतर स्मित यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले आहे. डॉ. शोटा मुसायेव यांनी रक्तस्राव थांबवण्यासाठी जखमांवर जवळपास 45 मिनिटे दाब दिला होता. त्यानंतर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.



